Inspirational Story : ब्रेन हॅमरेजनं बदललं आयुष्य; कोमातून बाहेर पडल्यावर पुस्तकातून शेअर केला अनुभव

sameer bhide
sameer bhide
Updated on

आपल्या आयुष्यात कधी कोणतं वळणं येईल आणि कशा पद्धतीने येईल याबाबत कोणीच सांगू शकत नाही. मात्र अचानक एक दिवस आलेलं हे वळणं तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. असंच काहीस घडलं मुळचे मुंबईचे असणारे मात्र अमेरिकेत स्थायिक असलेले समीर भिडे यांच्यासोबत. भिडे यांच्या आयुष्यात आलेल्या त्या एका दिवसाने त्यांचं संपूर्ण दैनंदिन आयुष्यचं पालटलं आणि त्यांच्या याच अनुभवावर भिडे यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलंय.
51 वर्षीय समीर भिडे यांना 2017 मध्ये दुर्मिळ प्रकारचा ब्रेन हॅमेरजचे निदान झालं. या ब्रेन हॅमरेजमुळं त्यांचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं.

आजाराने बेजार न होता बिकट परिस्थितीवर मात करता येते, हे त्यांनी दाखवून दिले. एवढेच नाही तर आपल्या अनुभवामुळे इतरांनाही प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी लेखणी हातात घेतली आणि एक पुस्तकही लिहिले. मंगळवारी 8 डिसेंबरला त्यांच्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. जाणून घेऊयात महिनाभर कोमात असून आयुष्याशी  झुंजणाऱ्या भिडे यांची प्रेरणादायी गाथेबद्दल... 

1990 मध्ये पुण्यात जन्मलेले समीर भिडे शिक्षणासाठी  अमेरिकेला गेले. त्यानंतर ते त्याचठिकाणी स्थायिक झाले. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. मात्र अचानक 31 जानेवारी 2017 मध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झालं आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळाली. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर भिडे जवळपास 1 महिना कोमामध्ये होते. सेरेबेलम व्हॅस्क्युलर अबनॉर्मेलिटी यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झालं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे फार दुर्मिळ आणि गंभीर मानलं जातं. या आजारपणामुळे त्यांच्या व्यावसायिक आणि वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या घटनेवरच त्यांनी ‘वन फाईन डे’ या शिर्षकाखाली पुस्तक लिहलं आहे.

या पुस्तकामध्ये समीर भिडे यांनी एका दिवसाच्या घटनेनंतर आयुष्यात आलेल्या  वादळाचे वर्णन केले आहे. त्याचसोबत भिडे यांनी त्यांच्या या आजारपणावर घेतलेल्या वैद्यकीय उपचारांबदद्ल देखील नमूद केलं आहे.
कोणाच्याही आयुष्यात अचानकपणे असा प्रसंग ओढावू शकतो. मात्र कठिण प्रसंगाला खंबीरपणे तोंड दिले तर यावर मात करणे सहज शक्य आहे. हे सांगण्याच्या उद्देशातूनच त्यांनी आपले अनुभव पुस्तक रुपातून शेअर करण्याचा निर्णय घेतला. ते  अमेरिकेतील बड्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. व्यवसायिक आणि वैवाहिक आयुष्य खूप उत्तम सुरु असताना  ब्रेन हॅमरेजनंतर सर्व काही होत्याच नव्हतं झालं. कोमातून बाहेर आल्यानंतर ते काही काळ अंथरूणावर होते.  वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला. आणि त्याचे रुपांतर घटस्फोटात झाले. त्या एका दिवसामुळे आयुष्य कोलमडल्यानंतरही ते डगमगले नाहीत. स्वत:शी कृतज्ञ राहुन त्यांनी यातून उभारण्याचा मार्ग शोधला. 

या आजारावर भिडे यांनी अनेक प्रदीर्घकाळ उपचार घेतले. समीर यांच्यात दृष्टी, उच्चार, शारीरिक हालचाल यामध्ये थेरेपीद्वारे सुधारणा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अॅलोपॅथी औषधोपचार देखील केले. याच जोडीला मेडिटेशन, योगा यासाठी ते भारतातही आले होते. याचसोबत अॅक्युपंक्चर, एनर्जी हिलींग, रागा थेरेपी या नॅचरोपॅथी आणि होलीस्टीक उपचारांवरही त्यांनी भर दिला.

भिडे यांच्यावर अजूनही उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. आजारपणाच्या या काळात मला अनेक वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती भेटल्या, तसंच माझे मित्र आणि ऑफिसमधील काही सहकारी यांनी फार मदत केली. त्याचप्रमाणे इतक्या गंभीर आजारातून माझे प्राण वाचले हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, हे सांगायला भिडे विसरत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.