'एसटी'ला अभिमान तुमच्‍या प्रामाणिकतेचा

Roshan Garde Jyoti Borate
Roshan Garde Jyoti Borate
Updated on

फलटण : येथील आगाराच्या बसमध्ये प्रवाशाचा विसरलेला सुमारे एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज बसचालक आणि वाहकांनी स्थानक प्रमुखांमार्फत संबंधित प्रवाशाचा शोध घेऊन त्याला परत केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. 

गुरुवारी (ता. नऊ) फलटण आगाराची बस (एमएच 11 बीएल 9355) चालक रोशन गोरखनाथ गार्डे (रा. ढवळ, ता. फलटण) आणि महिला वाहक ज्योती वसंतराव बोराटे (रा. राणंद, ता. माण, हल्ली फलटण) हे फलटण- तुळजापूर मार्गावर बस घेऊन जात होते. पंढरपूर बस स्थानकावर या बसमधील महिला प्रवासी उतरून जाताना बसमध्ये त्यांची पिशवी विसरली. चालक आणि वाहकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पंढरपूर येथील स्थानकप्रमुख आर. आर. लाड यांना त्याबाबत माहिती देऊन सदर पिशवी त्यांच्याकडे सुपूर्द केली. 

स्थानकप्रमुखांनी सदर प्रवासी मालकाचा शोध घेऊन पिशवी त्यांच्या स्वाधीन केली. पिशवीमध्ये सोन्याचे दागिने, कपडे, सहा हजार 326 रुपये असा सुमारे एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज होता. तो परत मिळाल्याने प्रवासी महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद ही एसटीची देणगी असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. 

चालक व वाहकांचा पंढरपूर स्थानक प्रमुख लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी, तसेच बस फलटण येथे पोचल्यावर फलटणचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, स्थानक प्रमुख वाडेकर, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहायक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, नंदकुमार सोनवलकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, सर्व संघटना पदाधिकारी, एसटीचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी सत्कार करून अभिनंदन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.