सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन १४ रुग्णवाहिका : आमदार वैभव नाईक

रुग्णालयांची गरज ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध
MLA Vaibhav Naik
MLA Vaibhav Naik sakal
Updated on

कुडाळ : राज्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.आमदार वैभव नाईक म्हणाले, ``मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर व आपल्या पाठपुराव्यातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका वितरित केल्या आहेत.

MLA Vaibhav Naik
Modi in UN : भारताची प्रगती होते तेव्हा जगाचाही विकास होतो - मोदी

यातील ११ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ व पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना रुग्णवाहिका देण्याची मागणी खासदार राऊत यांनी केली होती. ती मागणी पूर्ण केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी व तळकट, कणकवली तालुक्यातील कनेडी, कुडाळ तालुकयातील कडावल, पणदूर, वालावल, मालवण तालुक्यातील गोळवण, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, सांगेली, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे, रेडी या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. याआधीही राज्याच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्यात आल्या. राज्याकडे केलेल्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रव रुग्णालयांची गरज ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.``

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.