अबब ! हापूस निर्यातीतून `इतके` कोटी परकीय चलन

182 Cores Foreign Currency In Hapus Export Ratnagiri Marathi News
182 Cores Foreign Currency In Hapus Export Ratnagiri Marathi News
Updated on

रत्नागिरी - येथील हापूस हा जगप्रसिद्ध असला तरीही जिल्ह्यात होणाऱ्या उत्पादनापैकी अवघ्या आठ ते दहा टक्‍केच आंब्याची निर्यात होते. दीड लाख मेट्रीक टन उत्पादनापैकी 11 हजार 228 मेट्रीक टन फळाची तर 8 हजार मेट्रीक टन पल्पची निर्यात होते. त्यामधून 182 कोटी रुपयांचे परकीय चलन जिल्ह्याला मिळते. 

महाराष्ट्रात 5 लाख 66 हजार हेक्‍टरवर लागवड असून 3.31 लाख मेट्रीक टन उत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 65 हजार 109 हेक्‍टरवर आंबा लागवड असून 1 लाख 52 हजार 500 मेट्रीक टन उत्पादन मिळते. हेक्‍टरी उत्पादकता 2.50 मेट्रीक टन आहे. कोकणात 1 लाख 14 हजार 822 हेक्‍टरवर लागवड असून 2 लाख 70 हजार 52 मेट्रीक टन उत्पादन मिळते. कोकणातील हापूसला सर्वाधिक मागणी मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे येथून आहे. त्याचबरोबर गुजरात, अहमदाबादलाही हापूस जातो. जिल्ह्यात हापूसमधली उलाढाल सुमारे 1100 कोटी तर प्रक्रियेतून 100 कोटीपर्यंत आहे. 

देशांतर्गत बाजाराबरोबरच आखाती देशांसह अमेरिका, इंग्लंड, जपान, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे; परंतु देशातून निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी हापूसचा टक्‍का अत्यंत कमी आहे. सर्वाधिक निर्यात केशरची होते. त्यापाठोपाठ 20 टक्‍के हापूस आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 11 हजार 228 मेट्रीक टन हापूस निर्यात होतो. त्यातून 118 कोटीचे परकीय चलन प्राप्त होते. 

..त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल 

आंबा पल्पला सौदी अरेबिया, नेदरलॅंड, युरोपीय देश, अरब देश, कुवेत, अमेरिका, जर्मनी व चीन मधून खूप मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 8 हजार 4 मेट्रीक टन पल्प निर्यात होते. त्यातून 63 कोटी 39 लाख परकीय चलन मिळते. दोन्ही मिळून सुमारे 182 कोटी रुपये परकीय चलन रत्नागिरी जिल्ह्याला निर्यातीतून मिळते. निर्यात वाढविण्यासाठी वाहतूक सुविधेचा प्रश्‍न आहे. समुद्रमार्गे निर्यात होणार असेल तर त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. 

क्‍लस्टरमधून मॅंगो प्रोसेसिंग 

पल्पसाठी जिल्ह्यात क्‍लस्टर योजनेंतर्गत कोकण मॅंगो प्रोसेसिंग (रत्नागिरी) प्रा. लिमेटेडची स्थापना केली आहे. त्याचे 78 सभासद आहेत. त्या प्रकल्पाची क्षमता 3500 मेट्रीक टन इतकी असून सध्या 2500 मेट्रीक टन आंब्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून सुमारे 1250 मेट्रीक टन आंब्याचा पल्प तयार केला जातो. त्यातून सुमारे 10 कोटी रुपये उलाढाल होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.