प्रशासनाने झटपट केला वाडा परिसर सील

 19 areas in 3 villages sealed in sindhudurg district
19 areas in 3 villages sealed in sindhudurg district
Updated on

देवगड (जि. सिंंधुदुर्ग) : तालुक्‍यातील वाडा येथे आलेली एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाची झोप उडाली. पोलिसांसह प्रशासनाने तातडीने गावात धाव घेत सुमारे तीन किलोमीटर परिघाचा परिसर बंदिस्त केला. यात परिसरातील तीन गावांमधील 19 वाड्यांचा समावेश आहे. बाधिताच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याबरोबरच तपासणी सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण, आरोग्य सभापती सावी लोके, सभापती सुनील पारकर, तहसीलदार मारुती कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी तातडीने गावात जाऊन सूचना केल्या. पंचायत समिती सदस्या पूर्वा तावडे, सरपंच शीतल वाडेकर, सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, अमोल चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके, कुष्ठरोग तंत्रज्ञ एम. बी. जाधव, आरोग्य सहायक लिलाधर सोमनाथ, ग्रामसेविका सुनीता जाधव, मंडल अधिकारी आर. पी. मालवणकर, भालचंद्र मेस्त्री यांच्यासह अन्य स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. बाधित रुग्ण असलेल्या वाडा गावातील 14, पुरळमधील दोन आणि नाडणमधील तीन अशा 19 वाड्या बंदिस्त केल्या. सुमारे तीन किलोमीटरमधील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. यातील ग्रामस्थांना आता आत-बाहेर करता येणार नाही. यंत्रणेने ग्रामपंचायतीला भेट देऊन रुग्ण असलेल्या भागाचीही पाहणी केली. 

19 वाड्यांमधील सर्व कुटुंबांची माहिती घेऊन परिसरात आरोग्य यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य व्यक्‍तींचीही माहिती घेतली जाणार आहे. 
- डॉ. संतोष कोंडके, तालुका आरोग्य अधिकारी, देवगड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.