कोकण: पालगड किल्ल्यावर सापडले 22 शिवकालीन तोफगोळे

उत्साही तरूणांनी किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यासाठी एका ठिकाणी खोदकाम केले.
तोफगोळे
तोफगोळे इसकाळ
Updated on
Summary

उत्साही तरूणांनी किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यासाठी एका ठिकाणी खोदकाम केले.

खेड : दापोली तालुक्यातील पालगड (Palgad) आणि खेड (Khed) तालुक्यातील घेरा पालगड या दोन गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवकालीन पालगड किल्ल्यावर (Palgad Fort) शिवजयंतीच्या पुर्व संध्येला तयारीच्या कामासाठी गेलेल्या तरूणांना एकूण 22 तोफगोळे सापडले आहेत. (Shivjayanti 2022) उत्साही तरूणांनी या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्यासाठी एका ठिकाणी खोदकाम केले. सुरवातीला त्यांना एक गोळा सापडला. मात्र आणखी खोदकाम केले असता त्यांना एकूण 22 तोफगोळे सापडल्याने ते पाहण्यासाठी ग्रामस्थांसह इतरांना याठिकाणी गर्दी केली.

तोफगोळे
Photo: अंबाबाई चरणी आदित्य ठाकरे नतमस्तक; राजकारणावर बोलणं टाळलं

गोळा केलेले तोफगोळे किल्ल्यावरील एका जागेवर ठेवण्यात आले आहेत. शिवजयंतीच्या दिवशी ग्रामस्थांनी या गोळ्यांची विधीवत पुजा केली. यावेळी शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी किल्ल्याचा परिसर दणाणून गेला. (konkan) या किल्ल्यावर दरवर्षी झोलाई स्पोर्टस पालगड यांच्यामार्फत शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी प्रथमच तोफगोळे सापडल्याने किल्ल्यावर वेगळाच जोशाते वातावरण निर्माण झाले होते. अक्षय दाबेकर या तरूणाला पहिल्यांदा हे गोळे आढळले आहेत.

यावेळी झोलाई स्पोर्टसचे अध्यक्ष सुशांत पवार, सचिव श्रीराम पाटील, खजिनदार निखील पाटणे, माजी अध्यक्ष सुयोग वाजे यांच्यासहीत अन्य सभासदांनी मिळून नंतर खोदकामाचा निर्णय घेतला. पुरातन खाते या तोफगोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आता कोणती उपाययोजना करणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तोफगोळे
Whether Forecast : यंदा मॉन्सून सामान्य राहणार; स्कायमेटचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.