वीरगाव येथील मानवाकृती कातळशिल्पाला स्थानिक देवता म्हणून पाहिले जाते. या संबंधित दोन दंतकथा प्रचलित आहेत.
लांजा : तालुक्यातील वीरगाव येथे पिंपळाची बाऊल परिसरात एक आणि सुकाड येथे बावीस अशी २३ कातळशिल्पे शोधण्यात स्थानिक तरुणांसह अभ्यासकांना यश आले आहे. कातळशिल्पे (Katal Shilp Konkan) अश्मयुगीन कालखंडातील असून, त्यांच्या अभ्यासाला महत्व आहे. तज्ज्ञांच्या मते ही कातळशिल्पे अश्मयुगीन असून, त्यांचा कालखंड दहा ते बारा हजार वर्षे इतका पुरातन आहे.