चाकरमान्यांना घेऊन कोकणात धावली पहिली लालपरी ; नालासोपारा-मंडणगड- आंबडवे मार्गावर २५ प्रवाशांचा प्रवास

25 passengers traveling on Nalasopara-Mandangad Ambadwe route
25 passengers traveling on Nalasopara-Mandangad Ambadwe route
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : कोकणातील चाकरमानी यांना घेवुन पहिली लालपरी नालासोपारा मंडणगड आंबडवे दरम्यान २५ प्रवाशांना घेवून धावली. ता.९ मे रोजी रात्री ८ वाजता निघालेली ही एसटी नालासोपारा येथून कशेडी, खेड मार्गे अडचणींचा सामना करीत अखेर मंडणगड येथे ता.१० मे रोजी दुपारनंतर पोहचली. त्यातील सर्व प्रवाशांना आंबडवे येथील विलगिकरण कक्षात कोरोन्टाईन करण्यात येणार आहे.


 मुंबईतस्थित चाकरमनी कोकणवासीयांचे गावाकडील परतीच्या प्रवासाकरिता राज्यशासनाच्या आदेशाने नियोजीत केलेले कोकणातील पहीली लाल परी प्रशासकीय अडथळ्याची शर्यती पार करत ता.10 मे 2020 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाली. शनिवारी रात्री 8.00 वाजता मुंबई नालासोपारा येथून तहसीलदार श्री.सुरवसे, डेपो मॅनेजर दिलीप भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. काझी, रुपेश राऊत यांच्या उपस्थितीत मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावी येण्यासाठी ही बस मार्गस्थ झाली होती.

 बसमध्ये आबंडवे गावातील  21 नागरीक व 4 लहान मुले तालुक्यातील आपल्या गावी जाण्यासाठी मार्गस्थ झाले होते. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता मंडणगड तालुक्यास मुंबई व महानगरास गाडी मार्गाने जोडणारे म्हाप्रळ व लाटवण हे दोन्ही मार्ग प्रातांधिकारी दापोली यांनी चार दिवासापुर्वी काढलेल्या आदेशामुळे बंद करण्यात आले असल्याने नालासोपारा येथून आंबडवे येथे येण्यासाठी मार्गस्थ झालेली गाडी महाड पोलादपुर, कशेडी, खवटी मार्गाने प्रथम खेड तालुक्यात दाखल झाली.

येथे गाडीतील सर्व प्रवाशांचे स्वॅब तपासणी करण्याकरिता गाडीतील प्रवशांसह गाडी लवेल येथे मार्गस्थ झाली. लवेल येथे पोहचल्यावर तेथील क्कारंन्टाईन सेंटर आधीच पुर्णपणे भरलेली असल्याने व लवेल येथे गाडीतील सर्व प्रवाशांचे स्वॅब घेणे शक्य नसल्याने प्रशासकीय यंत्रणेने गाडीसह सर्व प्रवाशांची रवानगी मंडणगड येथे केली. त्यामुळे दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास 25 प्रवाशांनी भरलेली गाडी भिंगळोली येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल झाली. यानंतर तालुका आरोग्य विभाग व स्थानीक प्रशासनाने पुढील कारवाईस सुरुवात केली. 

आरोग्य विभागाने गाडीतील प्रवाशांची लेझर गनच्या माध्यमातून तपासणी केली आहे. या गाडीतून आलेल्या सर्व प्रवाशांनी मुंबई येथून वैद्यकीय तपासणी दाखला सोबत घेऊन, शासनाची अधिकृत परवानगी घेऊन आले असल्याने याशिवाय आलेले सर्व प्रवाशी नॉन केंटन्टेंमेंट झोनमधून आलेले असल्याने त्यांना गावातील महाविद्यालयामध्ये निर्माण केलेल्या विलगीकरण केंद्रांत चौदा दिवसांकरिता ठेवण्यात येणार असल्याची माहीती तहसिलदार मंडणगड यांच्याकडून मिळाली आहे. नागरिकांच्या निवासाची सर्व सोय ग्रामस्थ करणार असल्याची माहीती या निमीत्ताने मिळाली आहे. असे असली तरी सर्व प्रवाशी ग्रामस्थांची कोरोना तपासणी करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

हेही वाचा- अंतर्गत परीक्षा, पहिल्या सत्रावर गुण निश्‍चिती
 
समन्वयाचा अभाव
राज्यशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता दिल्यानंतर मुंबई महानगरांतून कोकणात आपल्या गावी परत जाण्यासाठी मुंबईस्थित कोकणवासीयांना त्यांच्या वास्तवाच्या प्रशासन अनुमती देत आहे, गावी जाणाऱ्या नागरीकांना कसा प्रवास करावा, त्यासाठी आवश्यक परवानग्या कोठून प्राप्त कराव्यात, या विषयी राज्यशासने आदेश काढून मार्गदर्शक सुचनाही प्रसिध्द केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळास प्रवाशांची वाहतूक कशी करावी याच्या मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. असे असताना कोरोना चाचणीकरिता खेड तालुक्यातील लवेल व तेथून मंडणगड असा प्रवास करावा लागल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून यापुढील काळात स्वॅब देण्याची तसेच विलीगीकरण प्रकाराची टांगती तलावरही त्यांच्यावर उभी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.