Fish Market : सुक्‍या मासळीच्या दरात २५ टक्‍के वाढ; खवय्यांच्या खिशाला बसणार झळ

गावागावांत जाऊन कोळी बांधव मोठ्या प्रमाणात सुकी मासळी विक्री करतात
25 percent increase price fish Due to changing climate and unseasonal rain mangaon konkan
25 percent increase price fish Due to changing climate and unseasonal rain mangaon konkansakal
Updated on

माणगाव : पावसाळा जवळ आल्याने बेगमीसाठी महिलांची लगबग सुरू आहे. सुकी मासळी खरेदी करणे, ती वाळवण्यात येत आहे, मात्र यंदा दरात २० ते २५ टक्‍के वाढ झाल्‍याचे महिलांवर्गात काहीशी नाराजी आहे.

श्रीवर्धन, भरडखोल, दिघी या ठिकाणावरून सुकी, ओली मासळी मोठ्या प्रमाणात येते. तालुक्यातील गावागावांत जाऊन कोळी बांधव मोठ्या प्रमाणात सुकी मासळी विक्री करतात. सध्या सुट्‌या लागल्‍याने चाकरमानी गावांत दाखल झाले आहेत. त्‍यांच्याकडूनही मोठ्‌या प्रमाणात सुकी मासळी खरेदी करण्यात येत आहे.

बदलते हवामान व अवकाळी पावसामुळे खोल समुद्रातही मासळी मिळेनाशी झाली आहे. मजुरांचा अभाव तसेच डिसेलच्या खर्चही निघत नसल्‍याने मुरूड, अलिबाग, दिवेआगार आदी समुद्र किनारी शेकडो मच्छीमार बोटी नांगरून ठेवल्‍या आहेत. परिणामी सुकी मासळीही बाजारात कमी प्रमाणात असल्‍याने दर वाढले आहेत. जवळा सुकट, अंबाडी, सुके बोंबील, वाकटी इत्यादी सुक्या मासळीचे दर वाढले असून कमीतकमी ४०० ते १२०० रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत.

जवळा म्हणजे बारीक सुकटचे भाव स्थिर असून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. मात्र इतर सुकटीचे भाव चढेच आहेत. कडक उन्हात मासळी सहज वाळत असली तरी मुळातच मासे मिळत नसल्‍याने सुक्या मासळीची कमी आवक, आणि मागणी जास्‍त असे चित्र असल्‍याचे विक्रेत्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान सुकी मासळी घेऊन विक्रीसाठी गावोगावी येणारे विक्रेते कमी झाले असल्याने ग्रामीण भागातील गृहिणींनी खंत व्यक्त केली असून पूर्वी प्रमाणे वारंवार येणारे विक्रेते कमी झाले आहेत. सुकी मासळीचे भाव वाढले असल्याने गृहिणींचे आर्थिक गणित बिघडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.