Sindhudurg News : समुद्र किनारी भागातील २७ कोटींची कामे मंजूर; बंदरविकास मंत्री बनसोडे यांचे आदेश

कामांबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री बनसोडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते तर जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी याबाबत पाठपुरावा सुरू होता.
Sindhudurg News
Sindhudurg NewsSakal

वेंगुर्ले : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील किनारपट्टी भागातील २७ कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचे आदेश बंदरविकासमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. या कामांबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री बनसोडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते तर जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी याबाबत पाठपुरावा सुरू होता.

राज्याच्या अर्थसंकल्पीय २०२४-२५ निधी अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील सागरी किनारपट्टी भागातील काही महत्त्वाच्या कामांना आगामी होणाऱ्या अर्थ संकल्पीय बजेट जुलै २०२४-२५ अंतर्गत समाविष्ट करून प्राधान्याने मंजुरी द्यावी, अशी मागणी मंत्री केसरकरांनी बंदरविकास मंत्री बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.

याबाबत श्री. वालावलकर यांनी पाठपुरावा केला होता. सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा खाडीलगत संरक्षक भिंत बांधणे ५ कोटी, कवठणी येथे संरक्षक भिंत बांधणे २ कोटी, शेर्ले येथे लक्ष्मी भगवान सावंत यांच्या जमिनीलगत संरक्षक भिंत बांधणे १.५० कोटी,

शेर्ले येथे भीमराव बाबाजी सावंत यांच्या जमिनीलगत संरक्षण भिंत बांधणे १.५० कोटी, आजगाव येथे दलित वस्ती ते तिरोडा खाजणादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधणे १.५० कोटी, कास येथे तेरेखोल खाडी पत्रामध्ये जेटी बांधणे १.५० कोटी,

वेंगुर्ले तालुक्यातील केळुस-मोबारवाडी जलमाई मंदिर येथे संरक्षण भिंत बांधणे १ कोटी, निवती श्रीरामवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे १ कोटी, रेडी-तेरेखोल रस्ता भीम नगर येथे संरक्षण भिंत बांधणे १ कोटी, पाल गणेश कोंड ते अणसुर-पाल पुलापर्यंत खाडीपात्रात धूप प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधणे १ कोटी, शिरोडा-केरवाडा येथे संरक्षक भिंत बांधणे १ कोटी,

परुळे-नेवाळकरवाडी येथे संरक्षक भिंत बांधणे १ कोटी, कर्ली-कोरजाई येथे संरक्षण भिंत बांधणे १ कोटी, कोचरा दत्त मंदिर येथे संरक्षक भिंत बांधणे १ कोटी, रेडी -लिंगेश्वर मंदिरजवळ संरक्षक भिंत बांधणे १ कोटी, नवाबाग समुद्रकिनारी संरक्षण भिंत बांधणे १ कोटी,

किल्ले-निवती भोगवे येथे संरक्षक भिंत बांधणे १ कोटी, वायंगणी-पोयंडेवाडी येथे खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधणे १ कोटी अशा एकूण २७ कोटींच्या कामांची मागणी मंत्री केसरकर यांनी श्री. बनसोडे यांच्याकडे केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com