Whale Fish Vomit
Whale Fish Vomitesakal

Whale Fish : रत्नागिरीत व्हेल माशाची तब्बल 2.75 कोटींची उलटी जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, सिंधुदुर्गातील चौघांना अटक

बाजारात उलटीची किंमत पावणेतीन कोटींच्या आसपास असल्याचे समजते.
Published on
Summary

‘स्पर्म’ (whale sperm) व्हेलच्या उलटीला परफ्युम (अत्तर) उद्योगात अतिशय महत्त्व आहे. तिला भरमसाट दर मिळून कोट्यवधीची कमाई होते.

रत्नागिरी : शहराजवळील चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी (Whale Fish Vomit) विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या मालवण, देवगड येथील चौघे संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून १८ हजार २० रुपयांचा मुद्देमालासह पावणेपाच किलोची उलटी जप्त केली.

बाजारात उलटीची किंमत पावणेतीन कोटींच्या आसपास असल्याचे समजते. वन्यजीव (संरक्षण) अधिनियामद्वारे हा गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे (Rural Police) वर्ग केला आहे. विकास अनंत मेस्त्री (वय ४८, रा. जामसंडे, तरवाडी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), समीर विठ्ठल तेली (३९, रा. बगाडवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग), राजेश मोतीराम जगताप (३४, रा. साईनाथवाडी देवगड, जि. सिंधुदुर्ग) महेश मनोहर ठुकरुल (४८, रा. टाटा पॉवर श्रीकृपा चाळ कमिटी, देवीपाडा, बोरीवली-मुंबई, मूळ ः जामसंडे, मळी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी संशयितांची नाव आहेत.

ही घटना सोमवारी (ता. ६) रात्री आठच्या सुमारास साळवी स्टॉप ते मिऱ्याबंदर जाणाऱ्या रस्त्यावरील चंपक मैदान येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर परिसरात पोलिस गस्त घालत असताना सोमवारी संशयित सायंकाळी आठच्या सुमारास साळवी स्टॉप ते मिऱ्याबंदर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला चंपक मैदान येथे व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने चंपक मैदान येथे मालवण, देवगड येथील चार संशयित आढळले.

त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटीसह १ हजार किमतीचा मोबाईल, १ हजार ९२० रुपये रोकड, ५ हजारांचा मोबाईल, दुसरा ५ हजारांचा मोबाईल असा १८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी तो जप्त केला. याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस फौजदार प्रशांत बोरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ४९, (ब) ५७, ५१ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या तपासात व्हेल माशाची उलटी ही पावणेपाच किलो वजनाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. या उलटीची किंमत पावणेतीन कोटींच्या आसपास असल्याचे समजते. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अमोल गोरे, प्रशांत बोरकर, हवालदार सुभाष भागणे, विनोद कदम, विजय आंबेकर, सागर सावळी, सत्यजित दरेकर व दत्ता कांबळे या पथकाने ही कारवाई केली.

परफ्युम उद्योगासाठी मागणी

‘स्पर्म’ (whale sperm) व्हेलच्या उलटीला परफ्युम (अत्तर) उद्योगात अतिशय महत्त्व आहे. तिला भरमसाट दर मिळून कोट्यवधीची कमाई होते. परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.