रत्नागिरी जिल्ह्यात १५-१८ वर्षांखालील ३० टक्के लसीकरण पूर्ण

विशेष शिबिरांचे आयोजन; ७१ हजार लाभार्थी
Corona Vaccine
Corona Vaccinesakal
Updated on

रत्नागिरी : देशभरात सुरू असलेला ओमिक्रॉनचा (omicron)वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेकडून कोरोना लसीकरणाला(corona vaccination) प्राधान्य दिले आहे. शासनाने १५ ते १८ वर्षांखालील बाधितांना लसीकरण सुरू केले असून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजारपैकी २० हजार ७६६ जणांना लस दिली. आतापर्यंत तीस टक्के जणांचे लसीकरण झाले आहे.

Corona Vaccine
'कमी वेळात, कमी खर्चात न्याय मिळण्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ गरजेचे'

जिल्ह्यात कोरोनाचे बाधित (ratnagiri corona update)दिवसेंदिवस वाढत आहेत. १८ वर्षांखालील लसीकरण सर्वाधिक झाल्यामुळे कोरोना बाधितांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. ऑक्सिजनवरील आणि अतिदक्षता विभागातील बाधितांचा आकडा एक आकडीच आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दोन मात्रा शंभर टक्के नागरिकांनी घेण्यावर भर देण्यात आला आहे. साडेदहा लाखांपैकी ७ लाख २८ हजार ७१० जणांनी दोन मात्रा घेतल्या आहेत. केंद्र शासनाकडून १५ ते १८ वर्षांखालील तरुणांसाठी कोव्हॅक्सीनचे लसीकरण सुरू केले आहे. आठवड्यातून बुधवारी आणि शनिवारी या वयोगटातील लाभार्थींना लस दिली जाते. नियमित केंद्रांबरोबच शाळा, महाविद्यालयांमध्येही व्यवस्था केली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार यशस्वीपणे नियोजन केले जात आहे. शनिवारी (ता. ७) सात हजार विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.

Corona Vaccine
दुष्काळामुळे शेकडो नौका हर्णै, आंजर्ले किनाऱ्यावर

जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे ७१ हजार लाभार्थी आहेत. आतापर्यंत २० हजार ७६६ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. हा डोस घेणाऱ्‍यांना ताप येत असला तरीही त्याचा प्रभाव जास्त काळ राहीलेला नाही. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाल्याच्या नोंदी आरोग्य विभागाकडे नाहीत. २००७ मध्ये जन्म झालेल्या लाभार्थी लसीकरणासाठी पात्र ठरत आहे. हा वर्ग सुरक्षित करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

दोन मात्रा घेणाऱ्‍यांचा टक्का वाढावा, यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नवीन आदेशाप्रमाणे १५ ते १८ वयोगटांतील लाभार्थींसाठी नियोजन केले आहे.

- विक्रांत जाधव,

अध्यक्ष, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.