Raigad News : थकलेल्‍या बिलांचा प्रश्‍न थेट विधानसभेत; किल्ल्‍यावरील कामांच्या वसुलीसाठी अडचणी

किल्‍ले रायगडावर दोन जून आणि सहा जूनला दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
350 shivrajyabhishek at raigad fort govt contractors didnt get money mahad
350 shivrajyabhishek at raigad fort govt contractors didnt get money mahadSakal
Updated on

महाड : रायगड किल्ल्यावर राज्य सरकारकडून तिथी व तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला होता. परंतु सोहळ्यासाठी खर्च केलेल्‍या रकमेची बिले ठेकेदारांना अदा करण्यात आली नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.

आता विधानसभा अधिवेशनामध्ये याप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केला जाणारा असून त्‍यासाठी प्रशासनाकडून माहिती मागवण्यात आली आहे. किल्‍ले रायगडावर दोन जून आणि सहा जूनला दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारी यंत्रणा व्यस्त होती तर तब्बल सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून रायगड जिल्‍हा नियोजन समितीच्या माध्यमातून खर्चास मान्यता देण्यात आली होती.

350 shivrajyabhishek at raigad fort govt contractors didnt get money mahad
Raigad News : दाभोळमध्ये अधिकृत रेती विक्री केंद्र सुरू,600 रुपये ब्रास दर; नोंदणीकृत वाहनाद्वारेच वाहतूक

किल्‍ल्‍यावर पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, जनरेटर, भोजन, महाड ते पाचाड एसटी महामंडळातर्फे मोफत बससेवा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदी सुविधांवर कोट्यवधींचा खर्च केला होता. विविध प्रकारच्या सोयी-सुविधांकरिता ठेकेदारही नेमण्यात आले होते.

परंतु या सर्व सेवा पुरवणाऱ्या ठेकेदारांना अद्याप बिले अदा करण्यात आलेली नाही. त्‍याची दखल घेत, पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.

सविस्‍तर माहिती अपेक्षित

सोहळ्यातील विविध कामासाठी किती ठेकेदार नेमण्यात आले होते, त्यांची किती बिले अदा केली, किती बाकी आहेत, याची सविस्तर माहिती आमदार नीलेश लंके यांनी तारांकित प्रश्‍नाद्वारे विचारली आहे. विधानसभेमध्ये प्रश्न स्वीकृत करण्याकरिता जिल्‍हा महसूल विभागाकडून उत्तर मागवण्यात आले आहे. सात डिसेंबरला हा प्रश्न विधानसभेत उपस्थित होण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.