मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! कोकणपट्ट्यात 380 जीवघेणे अपघात; 132 जणांचा बळी

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या ३८० अपघातांनी (Ratnagiri Accident) १३२ जणांचे बळी गेले आहेत.
Ratnagiri Accident
Ratnagiri Accidentesakal
Updated on
Summary

अपघातांची कारणे वेगवेगळी असली तरी सर्वाधिक अपघात रात्री १ ते ४ या वेळेत झाल्याची नोंद आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या ३८० अपघातांनी (Ratnagiri Accident) १३२ जणांचे बळी गेले आहेत. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर, रत्नागिरी-कोल्हापूर राज्यमार्ग व जिल्हा अंतर्गत मार्गांवर झालेले हे अपघात आहेत. यामध्ये १२० अपघात जीवघेणे ठरले आहेत. सर्वाधिक बळी मे महिन्यात गेले असून, अपघातांची संख्या ६३ आहे. त्यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Ratnagiri Accident
Loksabha Election : महायुती की महाविकास आघाडी? लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय

जिल्हा वाहतूक शाखेकडून (Transport Branch) मिळालेल्या माहितीमध्ये हे नमूद करण्यात आले आहे. तरी गतवर्षांच्या तुलनेत अपघातामध्ये घट झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या चौपदरीकरणाची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी अर्धवट आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काहीसे घटले आहे. गेल्या वर्षभरात ३८० अपघात झाले असून, १३२ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

एप्रिल महिन्यात ३६ अपघात झाले. १५ जणांचा मृत्यू झाला. अपघातांची कारणे वेगवेगळी असली तरी सर्वाधिक अपघात रात्री १ ते ४ या वेळेत झाले आहेत. म्हणजे झोप अनावर होऊन आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे हे अपघात झाल्याचे पुढे आले आहे. काही ठिकाणी गाडीचे टायर खराब असणे किंवा फुटणे, गाडीचे नियमित चेकअप् न करणे तसेच ब्लॅकस्पॉटवरही भरधाव वाहन चालवणे ही कारणे आहेत. भरधाव वेग हे देखील यातील एक प्रमुख कारण आहे.

Ratnagiri Accident
Ajit Pawar : पुरे झालं पाडायचं, आता लढायचं! निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटाची भूमिका

जिल्ह्यात ३ ब्लॅकस्पॉट असून ते दूर करण्यासाठी शासन, प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, तसेच सुरक्षा समितीचे खासदार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक, आरटीओ, बांधकाम विभाग या सर्वांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे अपघात कमी होण्यास मदत होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतुकीच्या नियमांबाबतचे पालन करा, असे आवाहनही वाहतूक शाखा आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Ratnagiri Accident
Uddhav Thackeray : 'शिवसेनेला 2014 च्या निवडणुकीतच संपविण्याचा डाव होता'; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

अपघाताची कारणे :

अपघातांची कारणे वेगवेगळी असली तरी सर्वाधिक अपघात रात्री १ ते ४ या वेळेत झाल्याची नोंद आहे. चालकाला झोप अनावर होऊन आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे हे अपघात घडण्याचे प्रमुख कारण पुढे आले आहे. काही ठिकाणी गाडीचे टायर खराब असणे किंवा फुटणे, गाडीचे नियमित चेकअप् न करणे तसेच ब्लॅकस्पॉटवरही भरधाव वाहन चालवणे ही कारणे आहेत. भरधाव वेग हे देखील यातील एक प्रमुख कारण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.