Shiv Rajyabhishek Din : रायगडावर शिवरायांची ४० किलो चांदीची मूर्ती

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज राजसदरेवर जल अन्‌ दुग्धाभिषेक
40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahad
40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahadsakal
Updated on

महाड (जि.रायगड) : लाखो शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून यावा, असा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. रायगडावर दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीनुसार आणि ६ जून रोजी तारखेनुसार दोन वेळा हा सोहळा साजरा होतो.

तिथीनुसार शुक्रवारी (ता.२) साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजसदरेवर जल अन्‌ दुग्धाभिषेक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची चाळीस किलो चांदीची मूर्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून कोकण कडा मित्र मंडळाच्या ताब्यात देण्यात आली.

शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे कार्याध्यक्ष नितीन पावले, कोकण कडाचे अध्यक्ष सुरेश पवार, समितीचे अध्यक्ष सुनील पवार दी शिवप्रेमींच्या उपस्थितीत ही मूर्ती गुरुवारी किल्ले रायगडावर नेण्यात आली.

40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahad
Raigad : अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका किरीट सोमय्यांनी घेतली मागे

गडावर तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी उत्सवमूर्ती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. यंदा शिवरायांच्या या चाळीस किलो वजनाच्या चांदीच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे.

आमदार भरत गोगावले व त्यांच्या पत्नीने या मूर्तीची पूजा केल्यानंतर मूर्ती रायगडावर सन्मानाने नेण्यात आली. रायगडावर उद्या होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतर मंत्री व लाखो शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahad
Raigad : रायगड किल्‍ल्‍यावर जलसंकट!शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला पाणीपुरवठा करताना कसरत

सकाळी सातपासून सुरू होणार कार्यक्रम

रायगडावर उद्या सकाळी ७ वाजता ध्वजपूजनाने कार्यक्रमास सुरुवात होईल. साडेसात वाजता पालखी पूजन केले जाईल. यानंतर आठ वाजता नगारखान्याजवळ मुख्य ध्वजा फडकविण्यात येईल.

राजसदरेवर सकाळी ९ वाजता मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा सुरू होईल. जंगम पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे. ११ वाजता राजसदर ते शिवसमाधी अशी शाही मिरवणूक काढली जाणार आहे.

40 kg silver idol of Chatrapati Shivaji Maharaj at Raigad mahad
Raigad: किल्ले रायगडावर मोठी दुर्घटना; विद्युत रोषणाई करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

रायगडावरील गाईडना आरोग्य विमा संरक्षण

रायगडचा इतिहास मांडणाऱ्या तब्बल २२ गाईडना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्या वतीने रायगडच्या गाइड लोकांना आरोग्य मदतीचा हात दिला आहे. या विम्यासाठी वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजारांचा समावेश आहे. गाइडच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.

उद्या (ता.२) ३५० व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्य विमा संरक्षण पत्र सर्व गाईडना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे. यासाठी खासदार श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे यांनी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.