Whale Fish Vomit : तब्बल पाच किलो 70 ग्रॅमची व्हेल माशाची उलटी जप्त; मालवण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकर्ली-वरचीवाडी येथे सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले.
Whale Fish Vomit
Whale Fish Vomitesakal
Updated on
Summary

आंतरराष्ट्रीय बाजार (International Market) दराप्रमाणे याची किंमत पाच कोटी सात लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओरोस : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकर्ली-वरचीवाडी (ता. मालवण) येथे सापळा रचून घराच्या बाजूला लपवून ठेवलेली तब्बल पाच किलो ७० ग्रॅमची व्हेल माशाची उलटी (Whale Fish Vomit) जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजार (International Market) दराप्रमाणे याची किंमत पाच कोटी सात लाख रुपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मालवण पोलिस ठाण्यात (Malvan Police Station) दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.

Whale Fish Vomit
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांवरील निलंबनाची कारवाई टाळली; शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका!

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : तारकर्ली-वरचीवाडीत व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी आणून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) मंगळवारी मिळाली. त्याची खात्री करून कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकर्ली-वरचीवाडी येथे सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले.

Whale Fish Vomit
Sangli Lok Sabha : षड्‍यंत्र रचून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेचा घात केला; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

त्याच्या घराच्या बाजूला लपवून ठेवलेली उलटी जप्त केली. याप्रकरणी आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हेड कॉन्स्टेबल आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे यांनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.