धरण प्रकल्पांचा प्रश्न मार्गी; जिल्ह्यातील धरणांना 500 कोटींचा निधी!

सतीश सावंतांनी केला पाठपुरावा, नरडवेला १७५ कोटी
500 Rupees
500 Rupeesesakal
Updated on

कणकवली : जिल्ह्यातील (sindhudurg) मध्यम आणि लघु पाटबंघारे प्रकल्पांना यंदाच्या हंगामासाठी तब्बल ५०० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने याची उपलब्धतता केली आहे. यात कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला १७५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. आगामी काळात रखडलेल्या धरण प्रकल्पांचा (dam project) प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

कोकण सिंचन (konkan update) महामंडळांतर्गत सुरू असलेल्या मध्यम पाटबंघारे प्रकल्पांची कामे गेली ३० वर्ष रखडली होती. कोकणातील धरण प्रकल्पांसाठी निधी मिळावा, अशी मागणी श्री. सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि जलसंपदा विभागाचे मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. हे प्रकल्प पुर्ण झाल्यास जिल्ह्याची सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेती आणि बागायतीसाठीच्या लाभक्षेत्रात वाढ होईल. त्यामुळे निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती.

500 Rupees
रत्नागिरीत : आपत्ती सौम्यीकरणासाठी जम्बो आराखडा

सावंत यांच्याकडून कणकवली मतदारसंघातील वैभववाडी, कणकवली देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प करण्यासाठी प्राधान्याने निधीची मागणी करण्यात आली होती. यानुसार पुढील आर्थिक वर्षासाठी धरण प्रकल्पांना निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हातील लघु पाटबंधारे अंतर्गत धरण प्रकल्पांना निधी मिळाला आहे. यात कणकवली विधानसभा मतदार संघातील धरण प्रकल्पाना प्राधान्याने निधी वितरीत करण्यात आला आहे.

कणकवली तालुक्यातील तरंदळे लघु पाटबंधारे प्रकल्पाला १० कोटी, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे धरण प्रकल्पाला ५ कोटी, कणकवली तालुक्यातील कळसुली देदोंवाडी लघु पाटबंधारे धरण प्रकल्पाला १० कोटी, कणकवली तालुक्यातील तळेरे धरणाला १ कोटी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे धरणाला १ कोटी आणि कुडाळ तालुक्यातील निरूखे धरणाला ८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सावंत यांनी दिली.

मंजूर निधी असा

- तिलारी ७७ कोटी
- कोर्ले सातंडी (ता. देवगड) १० कोटी
- देवघर प्रकल्प (कुर्ली -घोणसारी, कणकवली) ५० कोटी
- नरडवे मध्यम पाटबंघार (ता. कणकवली) १७५ कोटी
- सरंबळ मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता. कुडाळ) १ कोटी
- अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता. वैभववाडी) १५० कोटी
- विर्डी धरण प्रकल्प (ता. दोडामार्ग) १ कोटी.

500 Rupees
जळगावातील बलून बंधारे, टेक्स्टाईल पार्कसाठी पंतप्रधानांना साकडे

भिरवंडे-बिडवाडी प्रकल्प प्रस्तावित

कणकवली तालुक्यातील भिरवंडे, बिडवाडी, हरकुळ बुद्रुक या जलसंधारणच्या छोट्या प्रकल्पाला लवकरच मंजूरी मिळणार आहे, असे श्री. सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यात यापुढे मोठे धरण प्रकल्प न उभारता लहान धरण प्रकल्प उभारावेत, अशी मागणी शासनाकडे केली आहे. जेथे स्थानिक शेतकरी विस्तापित न होता. धरण प्रकल्प होत असेल तर त्याला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे असे श्री. सावंत म्हणाले.

"जिल्ह्यातील अन्य प्रकल्पाला निधी मंजूर केला जाणार आहे. मोठ्या धरण प्रकल्पापेक्षा कणकवली मतदार संघात लघु धरण प्रकल्प उभारावेत, जेणेकरून पुर्नवसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा आपला प्रयत्न राहणार आहे. गावागावात जोपर्यत शेती, फळबागायतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत या भागाचा आर्थिक विकास होणार नाही."

- सतीश सावंत, अध्यक्ष, जिल्हा बॅंक.

500 Rupees
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सोनू सूदचा मदतीचा हात; गावांमध्ये पोहोचवणार साहित्य

"नरडवे धरण प्रकल्पाची सुरूवात १९९६ मध्ये झाली. या प्रकल्पाचा दोनवेळा ठेकेदार बदलण्यात आला. तरीही प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सुटलेले नाहीत. गेली काही वर्ष प्रकल्पग्रस्त हा अन्याय सहन करीत आहे. आमची एकपिढी आता संपत आली आहे. त्यामुळे शासनाने निधी दिला तरीही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत धरणाचे काम करू देणार नाही."

- संतोष सावंत, सदस्य, धरणग्रस्त कृती समिती, नरवडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.