कोकण : गावखडीत वादळापासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण

५७ कासवांना जीवदान; यशस्वी प्रयोग, संशोधक सुमेधा कोरगावकरांची मदत
कोकण : गावखडीत वादळापासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण
Updated on

रत्नागिरी : 'निसर्ग' पाठोपाठ यावर्षी तौक्ते वादळ (tauktae cyclone) आले. यामुळे कासव संवर्धन मोहिमेला धक्का बसला आहे. यावर मार्ग काढत गावखडीतील कासवमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील यांनी संशोधक सुमेधा कोरगावकरांच्या मदतीने संवर्धनाचा प्रयोग यशस्वी केला. कासवांनी किनाऱ्‍यावर घातलेली अंडी लाटांपासून वाचवली. त्याची योग्य पद्धतीने देखभाल केली. अशा संवर्धनामुळे १२० पैकी ५७ कासवांना जीवनदान दिले.

कोरोनातील (corona) परिस्थितीसह निसर्गातील बदलांचा परिणाम कासवांचा विणीचा हंगाम २ महिने पुढे गेला होता. त्यात तौक्ते चक्रीवादळाचे सावट कासव संवर्धन मोहिमेवर निर्माण झाले होते. या वादळात अनेक किनाऱ्‍यावरील कासवांची घरटी वादळात गेली; मात्र रत्नागिरीतील गावखडी (gavkhadi, ratnagiri) येथील कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी, त्यांची अंडी वाचवण्यासाठी सर्वप्रथम पावले उचलली होती.

वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली गावखडी किनाऱ्‍यांवर गेली अनेक वर्षे कासव संवर्धन मोहीम प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी राबवित आहेत. तौक्ते वादळापूर्वी गावाखडी किनाऱ्‍यावरील घरटी 'मिड स्टेज'मध्ये म्हणजेच २८ दिवस झाल्यामुळे अंडी उबवण्याच्या स्थितीत होती. वादळाचा संदेश पाहता, ती कुठे ठेवायची, हाच मोठा प्रश्‍न त्यांच्यापुढे होता. त्यांनी घमेल्यात वाळू घेऊन त्यावर पाईप ठेवला. डिंगणकर यांचे सहकारी राकेश पाटील यांनी, अंड्यांना धक्का न लावता काळजीपूर्वक ती हलवली.

कोकण : गावखडीत वादळापासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण
'पटोले, सरनाईक काय म्हणतात सांगू नका; जे व्हायचं ते योग्य वेळी होतं'

घमेल्यात ठेवलेली पिल्ले बाहेर..

दरम्यान, कासव संवर्धनात अंडी हाताळणे सर्वात महत्वाचे असते. त्या दृष्टीने भक्कम बांधलेल्या झोपडीत वाळूने भरलेली ती घमेलं ठेवली. यामध्ये सुमारे १२० अंडी ठेवण्यात आली. तौक्ते वादळ येऊन गेल्यानंतर रोज ती घमेलं बाहेरील हवेत आणून ठेवली जायची. पुढील पंधरा दिवस हा उपक्रम नित्यनियमाने सुरू होता. ५ ते ६ जूनला घमेल्यात ठेवलेली पिल्ले बाहेर येऊ लागली. अंड्यातून पिल्लं बाहेर पडताच सर्वांना सुखद धक्का बसला. या प्रयोगामुळे सुमारे ५७ पिल्लांना जीवनदान मिळाले.

१४ मे रोजी पावले उचलली

वादळात ती अंडी पाण्यात राहिली तर पुढील भवितव्य अंधारात हे निश्‍चित होते. हेच लक्षात घेऊन गावखडीतील कासवमित्रांनी १४ मे रोजी डिंगणकर आणि पाटील यांनी पावले उचलली. प्रयोगासाठी त्यांनी पाहिजे तसा सेटअप् तयार केला. अंडी हॅचरीमधून हलवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्याही वनविभागाकडून त्यांनी घेतल्या होत्या.

कोकण : गावखडीत वादळापासून कासवांच्या अंड्यांचे संरक्षण
माजी मंत्री देणार आमदारकीचा राजीनामा?

"तौक्ते वादळामध्ये गावखडी किनारा समुद्राच्या लाटांमध्ये उद्ध्वस्त झाला. या परिस्थितीमध्येही कासवांची अंडी जपून ठेवली. त्यामधून पिल्लं बाहेर आल्यानंतर आमचा प्रयोग यशस्वी झाला. यामध्ये कासवावर संशोधन करणाऱ्‍या सुमेधा कोरगावकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांनीही हा प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला."

- प्रदीप डिंगणकर, कासवमित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.