Crime: पेण तालुक्यातील अर्थिक अपहार प्रकरणी माजी सरपंचांविरोधात गुन्हा दाखल

Crime: पेण तालुक्यातील अर्थिक अपहार प्रकरणी माजी सरपंचांविरोधात गुन्हा दाखल
sakal
Updated on

पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतीमध्ये अर्थिक अपहार झाल्याचा ठपका ठेवून न्यायालयाच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वनिता म्हात्रे, विद्यमान सरपंच परशुराम म्हात्रे आणि ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी डोलवी ग्रामपंचायतीकडून माहिती अधिकाराखाली माहिती मिळवली असता यात जवळपास २१ लाख ६१ हजार ८५२ एवढ्या रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले.

Crime: पेण तालुक्यातील अर्थिक अपहार प्रकरणी माजी सरपंचांविरोधात गुन्हा दाखल
Nagpur : पंचायत समिती परिसरात तळीरामांचा अड्डा?

याबाबतची तक्रार जांभळे यांनी पेणचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली; परंतु राजकीय दबावामुळे ठोस कारवाई होत नव्हती.

अखेर जांभळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता सहा महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे सांगितले. यावरून डोलवी ग्रामपंचायत माजी सरपंच वनिता म्हात्रे, ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांनी २०१९-२० ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ग्रामनिधीतील २१ लाख ६१ हजार ८५२ रुपये रकमेचा संगनमताने अपहार केला.

Crime: पेण तालुक्यातील अर्थिक अपहार प्रकरणी माजी सरपंचांविरोधात गुन्हा दाखल
Local Bodies Election: निवडणुका लांबल्याने इच्छुकांची कोंडी! जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेवर प्रशासक

विद्यमान सरपंच परशुराम म्हात्रे व ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांनी खावटी खरेदीच्या ८५ किट्सपैकी ६२ हजार ५१७ किमतीच्या सात किट्सचा अपहार केला. यामुळे बिडीओ यांनी ८ डिसेंबर रोजी तिघांवर वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामसेवक दिनेश मोहोरकर यांना निलंबित करण्यात येणार आहे. तसेच त्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अपहारातील रक्कम ही सरपंच आणि ग्रामसेवकाला अदा करावी लागेल. इतर कायदेशीर कारवाई पोलिसांमार्फत होणार आहे.

- भाऊसाहेब पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पेण

Crime: पेण तालुक्यातील अर्थिक अपहार प्रकरणी माजी सरपंचांविरोधात गुन्हा दाखल
Nandurbar News : गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन पेटविले? पंचायत समिती आवारातील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.