खेड तालुक्यातील 3 गावांत दरड कोसळली; 17 जण अडकल्याची शक्यता

खेड तालुक्यातील 3 गावांत दरड कोसळली; 17 जण अडकल्याची शक्यता
Updated on

रत्नागिरी: खेड तालुक्यातील पोसरे धामणन बोध्दवाडी येथे दरड कोसळल्याने ७ कुटुंबातील १७ जण व २४ जनावरे ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता आहे. १० जण जखमी असून उपचाराकरीता दवाखान्याकडे दाखल केले आहे. मुसळधार पावसाचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. दरड कोसळण्याचे प्रकार वाढले असून ठिकठिकाणी पूर परिस्थिती कायम आहे. जगबुडी नदीची पाणी पातळी कायम आहे.

खेड तालुक्यातील 3 गावांत दरड कोसळली; 17 जण अडकल्याची शक्यता
Photo : रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नद्यांना पूर; अनेक गावांचा तुटला संपर्क

खेड तालुक्यातील पोसरेत दरड कोसळून काही जण धिगाऱ्याखाली सापडले आहेत. चिपळूण तालुक्यातील कुभाली येथे घाटात दरड कोसळली होती. सदर ठिकाणी दरड हटविण्यात आली आहे. भात गावाला वडाची वाडी येथे रस्ता खचला आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गांवर आंबा घाटा त रस्ता खचला आहे. वाहतूक बंद केली आहे.

खेड तालुक्यातील 3 गावांत दरड कोसळली; 17 जण अडकल्याची शक्यता
Konkan Rain: रत्नागिरी जिल्ह्यात कुठे काय घडलंय; वाचा सविस्तर

रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी २२ जुलै रोजी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद पडली आहे. पूल वाहून गेले आहेत. लांजा तालुक्यात वेरवली कोंड ते भांबेड या दरम्यानचा पूल मुचकुंदी नदीला आलेल्या पुरात काल वाहून गेला. त्यामुळे या दोन गावांमधील जवळचे अंतर असलेला मार्ग बंद पडला आहे.‌ तसेच कासारकोळवन नदीवरील जुना पूल वाहून गेला आहे.

खेड तालुक्यातील 3 गावांत दरड कोसळली; 17 जण अडकल्याची शक्यता
Konkan Rain - रत्नागिरी जलमय; पुराचे पाणी रस्त्यावर

जगबुडी, नारिंगी नद्यांना महापूर

खेड : गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरूच असून, मुसळधार पावसामुळे गुरुवारी तालुक्यातील जगबुडी व नारिंगी नद्यांना महापूर आल्याने खेड बाजारपेठ पाण्याखाली बुडाली. तर नदी किनाऱ्यावरील अनेक गावांत पुराचे पाणी शिरून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.