Pali News : आगरी-कोळी बोलीभाषेच्या संवर्धनार्थ पाऊल; 'ब-बोली' नावाचे मासिक सुरु

पालघर पासून भिवंडी, ठाणे मुंबई व रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगरी-कोळी बंधुभगिनी राहतात. त्यांची भाषा ही आगरी-कोळी आहे.
b boli magazine
b boli magazinesakal
Updated on

पाली - असं म्हटले जाते जो पर्यंत आपल्या भाषेत साहित्य निर्मीती होत असते तो पर्यंत आपली भाषा टिकुन रहाते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी आगरी-कोळी बोली भाषेत लिहावं आणि बोली भाषेतील गोडी जगभर पोहचावी या उद्देशाने आगरी-कोळी बोलीभाषेच्या संवर्धनार्थ 'आगरी ग्रंथालय चळवळीवे' 'ब-बोली' नावाचे मासिक सुरु केले आहे. या मासिकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. 8) राज ठाकरे यांच्याहस्ते झाले.

या मासिकाचे संपादन प्रसिध्द चित्रकार, कवी मोरेश्वर पाटील व प्रकाश पाटील (पनवेल) करणार असुन या मासिकाचे प्रकाशक दया नाईक व सर्वेश तरे असणार आहेत. हे मासिक पुस्तक (हार्ड कॉपी) तसेच ई-बुक स्वरुपात देखील उपलब्ध होणार आहे.

पालघर पासून भिवंडी, ठाणे मुंबई व रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगरी-कोळी बंधुभगिनी राहतात. त्यांची भाषा ही आगरी-कोळी आहे. आगरी-कोळी बोलीला लोकगीतांची मोठी पारंपारिक संस्कृती-परंपरा आहे. धवला म्हणजे महिला पुरोहिताने गायला जाणारा हा प्रकार प्राचीन काळापासुन चालत आलेला गीतांचा प्रकार या बोलीत आहे. परंतु तेच बोली भाषेतील लिखित-प्रकाशीत साहित्यात फार मोजकेच लोक आहे. परिणामी जास्तीत जास्त लोकांना आगरी-कोळी बोली भाषेत लिहावं आणि बोली भाषेतील गोडी जगभर पोहचावी या उद्देशाने आगरी-कोळी बोलीभाषेच्या संवर्धनार्थ 'आगरी ग्रंथालय चळवळीने' 'ब-बोली' नावाचे मासिक सुरु केले आहे.

‘ब’ आईचा

आगरी-कोळी बोली भाषेत 'ब' या शब्द 'आई' साठी वापरला जातो. आपल्या ब ची (आईची) बोली म्हणजेच आगरी कोळी बोली भाषेत हे संपुर्ण मासिक तयार करण्याचे ठरले आहे. इतर भाषिकांना ही बोली समजावी यासाठी आगरी-कोळी-मराठी शब्दकोशाचाही यात समावेश करण्यात येणार आहे.

आगरी-कोळी बोलीभाषेत पहिले मासिक

आगरी-कोळी बोलीभाषेत असणारं हे पहिलं मासिक मराठी साहित्यातील संपुर्णत: आगरी-कोळी बोलीभाषेत असणारं हे पहिलं मासिक म्हणजेच ‘ब-बोली’ मासिक ठरलं अन अगदी कमी वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेक मोठ्या मान्यवरांपर्यंत हे मासिक पोहचले आणि सर्वांनीच याचे कौतुकही केले.

नवोदित व साहित्यिकांना संधी

आगरी ग्रंथालय चळवळी तर्फे ‘ब बोली मासिकाची’ दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचे ठरवीले आहे.

या मासिकात लिहीलेले (स्वलिखीत) लेख, चारोळ्या, कविता,लघुकथा,दिर्घकथा,प्रवासवर्णन,व्यक्तीचित्रण,पाककला, व्यंगचित्रे वा इतर केवळ आगरी-कोळी बोलीतील साहित्य 17 डिसेंबर २०२३ पर्यंत पाठविण्याचे आवाहन आगरी ग्रंथालय चळवळी मार्फत केले आहे. साहित्य पाठविण्याचा ईमेल पत्ता

पुढील क्रमांकांवर whatsappवर आपण

संपर्क साधू शकता.

दया नाईक : 98811 33444

सर्वेश तरेः 9096720999

Mail: agarigranthalay@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.