Raigad News : शैक्षणिक सहलींसाठी किल्‍ले रायगडला पसंती; दोन महिन्यांत ३५ हजार विद्यार्थी दाखल

रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सध्या शैक्षणिक सहलींनी गजबजली आहेत.
academic education trip preference to raigad fort 35 thousand students visited
academic education trip preference to raigad fort 35 thousand students visitedsakal
Updated on

महाड : रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सध्या शैक्षणिक सहलींनी गजबजली आहेत. विद्यार्थ्यांना गडकिल्ले व समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण असल्याने शैक्षणिक सहलींसाठी जिल्ह्याला पसंती मिळत असून दोन महिन्यांत तब्बल ३० ते ३५ हजार विद्यार्थी दाखल झाले होते.

दिवाळी सुटीनंतर, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात अनेक शाळा शैक्षणिक सहलींचे आयोजन करतात. शाळेमध्ये विविध विषयांचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकातील अनेक स्थळे व घडामोडींची ओळख विद्यार्थ्यांना सहलीतून होत असते.

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, पर्यटन स्‍थळांची माहिती मिळावी, यासाठी राज्यभरातून अनेक शाळांच्या सहली सध्या रायगड जिल्ह्यात दाखल होत आहे. यामध्ये रायगड किल्ल्याला विशेष पसंती दिली जात आहे. छत्रपती शिवरायांचा पराक्रम व रायगड किल्ला यांचे अभ्यासक्रमातही मोलाचे स्थान असल्याने गडकिल्ल्यावरील सहलीला शाळांमधून खास पसंती दिली जात आहे.

आंबेजोगाई, फलटण, नांदेड, लातूर, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कोल्हापूर, सांगली संभाजीनगर, जालना अशा लांब पल्ल्याच्या ठिकाणांहूनही अनेक शाळा विद्यार्थ्यांना घेऊन जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. यामुळे सध्या रायगड किल्ल्याबरोबरच हरिहरेश्वर-श्रीवर्धन, दिवेआगर, मुरूड जंजिरा, अलिबाग आदी ठिकाणे विद्यार्थ्यांनी बहरली आहेत.

गडकिल्ले, पुरातन मंदिरे, तलाव, लेणी, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, अभयारण्य आदी ठिकाणांना सहलीमध्ये प्राधान्य दिले जाते. चवदार तळे पाहण्यासाठीही विद्यार्थी येत असून महाडमध्ये अनेक विद्यार्थी रात्रीचे भोजन व निवास करतात.

दोन महिन्यांमध्ये सुमारे २५ ते ३० हजार विद्यार्थ्यांनी रायगड पर्यटनाचा लाभ घेतल्याचे रोप वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. फेब्रुवारीपर्यंत शैक्षणिक सहलीचा हंगाम असल्याने निवास, भोजन व्यवस्था, तसेच इतर रोजगारांना चालना मिळत आहे. बहुसंख्य सहली एसटीने येत असल्याने आगारांनाही फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली येत असून विद्यार्थ्यांना रोप वेकडून विशेष सवलतीही दिली जात आहे. याचा फायदा अनेक शाळा घेत आहेत. राज्‍यातील अनेक भागांतून सहली दाखल होत आहेत.

- राजेंद्र खातू, व्यवस्थापक, रायगड रोप वे

पुस्तकातील पर्यटन स्थळे तसेच विविध ऐतिहासिक घटनांची माहिती सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाणता येते. त्‍यांच्यातील चिकित्‍सक वृत्ती जागृत होते.

- मुरलीधर काळे, शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()