पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मृतदेह पुरल्याचा संशय असलेल्या ठिकाणाची पाहणी केली.
मळेवाड : येथील एका चिरे खाणीजवळ तीन वर्षांच्या बालिकेचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना दडपण्यासाठी तिचा मृतदेह त्याच भागात पुरल्याच्या संशयावरून येथे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संभाव्य घटनास्थळी जात पाहणी केली. याप्रकरणी खातरजमा करून त्यात तथ्य आढळल्यास संशयितांवर गुन्हे दाखल करत पुढील प्रक्रिया करणार असल्याचे सावंतवाडी पोलिसांनी (Sawantwadi Police) सांगितले.