शेतकरी गुरे चरण्यासाठी बाहेर सोडून देतात. ती रस्त्यावर येतात. ही गुरे वाहतुकीत अडथळा निर्माण करतात.
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) खेड-लोटे-चिपळूण येथे रस्त्यात मोकाट गुरे उभी अथवा बस्तान मांडून असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महामार्गांवर मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असून, त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.