Ratnagiri : पैशाच्या हव्यासापोटी वृद्धाचा गळा चिरून खून; हत्येनंतर गोव्यात मौजमजा, आरोपी रत्नागिरीत!

हॉटेलमध्ये आलेल्या वृद्धाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचा प्रकार ठाण्यात घडला होता.
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

हत्या केल्यानंतर त्याने एटीएमसह थेट रत्नागिरी गाठली. तेथे त्याने एटीएममधून ८० हजार रुपये विविध ठिकाणांहून काढले. येथे मौजमजा केल्यानतंर तो गोव्याच्या दिशेने पळून गेला.

रत्नागिरी : पैशाच्या हव्यासापोटी हॉटेलमध्ये आलेल्या वृद्धाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचा प्रकार ठाण्यात घडला होता. यातील संशयित खुनी पैसे काढण्यासाठी आणि आश्रयाला रत्नागिरीत (Ratnagiri) आल्याचे उघड झाले.

पैसे काढल्यानंतर तो गोवामार्गे नेपाळला गेला होता; परंतु ठाणे पोलिस (Thane Police) त्याच्या मागावर होते. मोबाईल लोकेशनवरून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. ठाणे शहरातील एका हॉटेलमध्ये काराभाई रामभाई सुवा हे वृद्ध उतरले होते. याच हॉटेलमध्ये राजन शर्मा हा वेटर काम करत होता.

Crime News
Satara : शिवस्मारकाला धक्का न लावता पोवई नाक्यावर बाळासाहेबांचं स्‍मारक होणारच; वादावर देसाईंची स्पष्ट भूमिका

सुवा यांच्याकडे रोकड नव्हती. त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी विश्वासाने वेटर राजनकडे एटीएम कार्ड, पिन नंबर दिला. या वेळी त्यांच्या बँक खात्यात खूप पैसे असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने २७ मे २०२३ ला काराभाई रामभाई सुवा या ज्येष्ठ नागरिकाचा गळा धारदार शस्त्राने चिरून हत्या केली होती. त्यानंतर राजन तेथून पळून गेला होता.

Crime News
Suresh Khade : खून, दरोडा, चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे सांगलीत घडताहेत; पालकमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

हत्या केल्यानंतर त्याने एटीएमसह थेट रत्नागिरी गाठली. तेथे त्याने एटीएममधून ८० हजार रुपये विविध ठिकाणांहून काढले. येथे मौजमजा केल्यानतंर तो गोव्याच्या दिशेने पळून गेला. गोव्यातून थेट उत्तर प्रदेशाला पोहचला. गोव्यात मुक्काम केल्यानंतर पोलिस मागावर येतील, या शक्यतेने तो नेपाळला पळून गेला होता; मात्र ठाणे पोलिसांनी सीमकार्डच्या लोकेशनवरून त्याला शोधून काढत अटक केली आहे. पोलिसांनी याला दुजोरा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.