आचऱ्याची `डाळपस्वारी` 25 पासून 

achra dalpswari function konkan sindhudurg
achra dalpswari function konkan sindhudurg
Updated on

आचरा (सिंधुदुर्ग) - अवघ्या आचरावासीयांमध्ये उत्साह निर्माण करणाऱ्या येथील इनामदार श्री देव रामेश्‍वर संस्थानची डाळपस्वारीची तारीख जाहीर झाली आहे. 25 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना राबवत डाळपस्वारी होणार असल्याचे मानकरी शंकर मिराशी यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील जागृत आणि प्राचिन शिवस्थानामुळे इनामदार श्री देव रामेश्‍वर संस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. येथील सण उत्सव संस्थानी थाटात साजरे होत असतात. अशाच प्रकारे दर तीन वर्षांनी होणारी डाळपस्वारी यावर्षी श्रींच्या कौल प्रसादाने 25 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणार आहे. 

अत्यंत शाही थाटात होणाऱ्या या डाळपस्वारीस 25 पासून सुरवात होणार असून 24 रोजी सायंकाळी पुर्वस आणला जाणार आहे. 25 रोजी सकाळी रामेश्‍वर मंदिर येथून श्रींची स्वारी डाळपस्वारीला बाहेर पडणार आहे. आचरा बाजारपेठ फुरसाई मंदिर येथील डाळप करून पाठांतरी ब्राह्मण, मिराशीवाडीमार्गे सायंकाळी नागझरी गिरावळ (पुर्वी आकारी) मंदिर येथे विसावणार आहे.

26 रोजी दुपारी गिरावळ मंदिर येथे रास पोटाळून भंडारवाडी, बौद्धवाडी येथील स्थळ येथून सायंकाळी उशिरापर्यंत गाऊडवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे मुक्कामाला थांबणार आहेत. 27 रोजी सकाळी गाउडवाडी येथून पांगेवाडी मंडप जामडूल, पिरावाडी चव्हाटामार्गे हिर्लेवाडी ब्राम्हणदेव मंदिरास भेट देऊन पहाटे पुन्हा गिरावळ मंदिराकडे येणार आहेत. येथे रविवार, सोमवारी विश्रांतीनंतर 2 मार्चला गिरावळ मंदिर येथून आचरा बाजारपेठमार्गे नागोचीवाडी ब्राह्मणदेव, पारवाडी ब्राह्मणदेव मंदिर येथून रामेश्‍वर भेटीनंतर गांगेश्‍वर मंदिराकडे स्थिरावणार आहे. 

आचऱ्यात चैतन्याचे वातावरण 
काल सायंकाळी झालेल्या बारा पाच मानकरी, देवसेवक यांच्या बैठकीनंतर डाळपस्वारीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे आचरे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून श्रींच्या स्वारीच्या स्वागतासाठी वाडीवाडीवरील मंडळातर्फे नियोजनासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे.  

संपादन - राहुल पाटील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.