महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतरही कत्तलीसाठी गो तस्करी करणाऱ्या गाडीवर कारवाई

Banda Police Station : गायीला राज्यमाता दर्जा जाहीर केल्यानंतर देशी गाईंची तस्करी होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
Cows Slaughter
Cows Slaughteresakal
Updated on
Summary

गायींची तस्करी होण्याची माहिती गो रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे सापळा रचला होता.

बांदा : महाराष्ट्र शासनानं गोमातेला (Cow) राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर कत्तलीसाठी गो तस्करी करणाऱ्या गाडीवर आज पहाटे इन्सुली खामदेव नाका येथे कारवाई करण्यात आली. ही गाडी देवगडहून कर्नाटकच्या दिशेने जात होती.

गायीला राज्यमाता दर्जा जाहीर केल्यानंतर देशी गाईंची तस्करी होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. बांदा पोलीस ठाण्यात (Banda Police Station) पुढील कारवाई सुरु आहे.

Cows Slaughter
Nitin Gadkari : 'झाले बहु, होतील बहु यासम हा' असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व; काय म्हणाले गडकरी?

गायींची तस्करी होण्याची माहिती गो रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे सापळा रचला होता. गायींच्या बेकायदा तस्करीमुळे राज्यमातेचा दर्जा देऊनही गाय सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.