संघटनेचे अध्यक्ष आवारे यांनी राजकोट किल्ल्यातील महाराजांचे स्मारक कोसळल्याच्या बातम्या व सोशल मीडियावर फोटो पाहिल्यावर शिवप्रेमी म्हणून आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे.
मालवण : राजकोट किल्ला (Rajkot Fort) येथील छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा (Dharamveer Chhatrapati Sambhaji Raje Shaurya Pratishthan Marathwada) या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते काल रात्री छत्रपतींचा पंधरा फुटी अश्वारूढ पुतळा घेऊन मालवणात दाखल झाले. प्रशासनाला याची माहिती मिळताच तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून पुतळा उभारण्यास प्रशासनाची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही माघारी परता असे आवाहन केले. त्यानुसार रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा मालवणातून रवाना करण्यात आला.