आडाळीतील काम रोखणाऱ्यांची गय नाही ः शिवसेना

adali work issue shivsena statement konkan sindhudurg
adali work issue shivsena statement konkan sindhudurg
Updated on

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - आडाळी एमआयडीसी काम वैयक्तीक स्वार्थासाठी रोखून चुकीची माहिती देवून दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय न करता काम सुरू करावे, अशी भूमिका शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकातून मांडली आहे. 

आडाळी एमआयडीसीबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकावर शिवसेनेचे उपविभागप्रमुख मिलिंद नाईक, तालुका संघटक संजय गवस, भीवा गवस आदींचा उल्लेख आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड वर्षांपासून आडाळी गावात एमआयडीसी जागेत अंतर्गत सुविधा निर्माण करण्यासाठी ठेकेदाराने युध्दपातळीवर काम सुरु केले होते. मध्यंतरी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर तसेच पावसामुळे आडाळी येथील काम रखडले होते.

नुकतेच हे काम सुरू झाले असताना संबंधित अधिकारी यांच्याकडे चुकीच्या तक्रारी करुन शासनाची दिशाभूल करण्याचा प्रकार काही मंडळी आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी करत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर दबाव आणून सुरू असलेले काम थांबवले आहे. तो दोडामार्ग तालुक्‍यातील जनतेवर अन्याय आहे. तेव्हा कुणाच्या दबावाखाली बळी न पडता काम करत असलेल्या ठेकेदाराकडून काम करून घ्यावे, नाहीतर शिवसेना पदाधिकारी गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

गेल्या दीड वर्षात कामाला सुरुवात झाली होती; पण गेल्या डिसेंबरमध्ये हे काम बंद करुन येथे काम करत असलेल्या ठेकेदारासंदर्भात खोट्या तक्रारी करुन संबंधित अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हा अन्याय आहे. काम थांबले तर पुढे येणारे उद्योग व्यवसाय येथे यायला विलंब होणार आहे. केवळ हातावर मोजण्या इतक्‍या लोकांचा विरोध हा विकासावर परिणामकारक आहे. शिवाय जे आडकाठी आणत आहेत त्या मंडळीकडे तरी काम करण्याजोगी यंत्रणा आहे काय, नसेल तर मग ते अधिकारी कुणाच्या दबावाखाली वावरत आहेत असा प्रश्‍न मिलिंद नाईक यांनी विचारला आहे. 

निव्वळ दिशाभूल 
आडाळी येथील एमआयडीसीच्या जागेत उद्योग व्यवसाय उभे राहिले पाहिजे, यासाठी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी अंतर्गत सुविधा निर्माण करण्यासाठी काम सुरू करायचा प्रारंभ केला होता. कामाला सुरुवात झाली; पण याठिकाणी आता काही मंडळी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम बंद करुन शासनाला खोटी माहिती देऊन एक प्रकारे कामासंदर्भात दिशाभूल करत आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.