छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे समर्थक आणि राणे समर्थक यांच्यात तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी राजकोट किल्ल्यावर धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.