Agricuture News : तर सिंधुदुर्ग जिह्यातील २५० कृषी सेवाकेंद्रे होणार कायम स्वरूपी बंद!

Agricuture News : तर सिंधुदुर्ग जिह्यातील २५० कृषी सेवाकेंद्रे होणार कायम स्वरूपी बंद!

Published on

Agricuture News: महाराष्ट्र सरकारचे कृषी सेवा केंद्रांबाबत काही प्रस्ताविक कायदे आहेत. या कायद्यांना कृषी सेवा चालकांचा विरोध आहे. हे कायदे अंमलात आणले तर सिंधुदुर्गातील २५० कृषी सेवा केंद्रे बेमुदत बंद ठेवू,असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा अ‍ॅग्रो मार्केटियर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.


असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी येथील हॉटेल सह्याद्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी अध्यक्ष हेमंत सावंत, उपाध्यक्ष ऋषीकेश परब, पंकज दळी, सदस्य गोविंद हरमळकर उपस्थित होते. हेमंत सावंत म्हणाले, ‘‘शासनाचे काही प्रस्तावित कायदे आहेत.

Agricuture News : तर सिंधुदुर्ग जिह्यातील २५० कृषी सेवाकेंद्रे होणार कायम स्वरूपी बंद!
Agri Tourism : कृषी पर्यटनासाठी कृषी विद्यापीठाचा पुण्यातील संस्थेसोबत समंजस्य करार

त्‍यात कृषी सेवा केंद्रांवर बियाणे, खते, औषध आदींमध्ये गैरप्रकार आढळल्यास संबंधित कृषी सेवा चालकाला दोषी धरण्यात येईल. तसेच त्‍याच्यावर वाळू माफीया वगैरेसाठी असलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

सदरच्या कायद्यात अटक होत असून जामीन मिळत नाही; मात्र, कृषीविक्रेता हा एखाद्या कंपनीने उत्पादित केलेला माल विकत असतो. कंपनीचा माल विक्रीसाठी आमच्याकडे येतो, त्याची कृषी विभागाकडून तपासणी झालेली असते. तरीही त्यामध्ये गैरप्रकार आढळल्यास कृषी सेवाचालकाला दोषी धरणे चुकीचे आहे.’’ सावंत पुढे म्हणाले, ‘‘या प्रस्ताविक कायद्यांबाबत आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांना निवेदने दिली.

केवळ तोंडी आश्वासने मिळाली; पण, लेखी आश्वासने देण्याबाबत सरकारने टाळटाळ केली, म्हणून आम्ही संपाचे पाऊल उचलले. वास्तविक कृषी सेवा केंद्रे म्हणजे शासन व शेतकरी यांमधील दुवा असून ही केंद्रे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यही करतात.

तरीही कृषी सेवा केंद्रांच्या विरोधात कायदे का आणले जातात? कारण, असे कायदे देशातील कुठल्याही राज्यात नाहीत. वास्तविक काही गैरप्रकार घडल्यास कृषीसेवा चालकाला आरोपी नव्हे तर साक्षीदार बनवायला हवे, अशी आमची भूमिका आहे.’’

Agricuture News : तर सिंधुदुर्ग जिह्यातील २५० कृषी सेवाकेंद्रे होणार कायम स्वरूपी बंद!
Agricultural Service Centre : राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.