Raigad Lok Sabha Poll : जे कुणाचेच राहिले नाहीत ते जनतेचे काय होणार; अनंत गीतेंचा सुनिल तटकरेंवर हल्लाबोल

रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. सुनिल तटकरे यांच्यावर अनंत गीते सडकून टीका करीत आहेत.
Raigad Lok Sabha Poll
Raigad Lok Sabha Pollsakal
Updated on

पाली : रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. सुनिल तटकरे यांच्यावर अनंत गीते सडकून टीका करीत आहेत. शनिवारी (ता.6) सायंकाळी उशिरा सुधागड तालुक्यातील परळी येथे झालेल्या प्रचार सभेत अनंत गीते यांनी सुनील तटकरेंवर पुन्हा हल्लाबोल केला.

जे कुणाचेच राहिले नाहीत ते जनतेचे काय होणार असे अनंत गीते म्हणाले. ज्या बॅरिस्टर अंतुले यांनी राजकीय जन्म दिला, त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या शरद पवार साहेबांनी मान, सन्मान,

प्रतिष्ठा, मंत्रीपदे, आमदारकी खासदारकी एवढं सगळं दिलं त्यांच्या पाठीतही खंजीर खुपसला, 2019 ला मी तटकरेंना हद्दपार करणार होतो, मात्र ज्या जयंत पाटील यांनी त्यांची हद्दपारी वाचवली त्या जयंत पाटीलांच्या पाठीत खंजीर खुपसला,

त्यांना पाठिंबा देणाऱ्या मधुकर पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसला. जे या कुणाचेच राहिले नाहीत ते तुमचे जनतेचे काय राहणार असे घणाघाती टीकास्त्र अनंत गीते यांनी परळी सुधागड येथील प्रचार सभेत सुनिल तटकरे यांच्यावर सोडले.

अनंत गीते पुढे म्हणाले की रायगडची लोकसभा निवडणूक ही भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. मागील वेळेला दुर्दैवाने सदाचाराचा पराभव झाला, याच शल्य माझ्यापेक्षा जास्त जनतेच्या मनात आहे. प्रत्येक सभेत माझे उत्स्फूर्त स्वागत व प्रतिसाद होतोय.

मुस्लिम समाज माझ्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे. एका सभेत फोटो काढण्यासाठी मंचावर आलेल्या मुस्लिम बांधवाने "गीते साहब रायगडमे आपकी त्सुनामी आणे वाली है" अस ठणकावून सांगितलं असल्याची आठवण गीतेंनी करून दिली. त्या त्सुनामीत हे गटांगळ्या खात जातील असे गीते म्हणाले. हा रायगड आहे. तटकरे यांचा आता कडेलोट करायचा आहे. सर्व समाज घटक , विविध संघटना आपल्यासाठी काम करतात.

यावेळी अनिल तटकरे, राजेंद्र राऊत, दिनेश चिले आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अनंत गीते,राष्ट्रवादी शरद पवार प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे, लोकसभा समन्वयक संजय कदम, शेकाप नेते सुरेश खैरे, जिल्हा संपर्कप्रमुख विष्णु पाटील,

सहसंपर्कप्रमुख किशोर भाई जैन, निवडणूक प्रमुख राजेंद्र राऊत, काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिरुद्ध (बाबा) कुलकर्णी, आप तालुका संयोजक अशोक रायकर, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, सुधागड तालुका प्रमुख दिनेश चिले, जगदीश गायकवाड, तालुका संपर्कप्रमुख विनेश सितापराव, तालुका संघटक रमेश सुतार, शेकाप महिला आघाडीच्या भारती शेळके, समृद्धी यादव आदींसह महा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

भाजप सत्तेत आली तर 2024 नंतर देशात निवडणुकाच होणार नाहीत ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. संविधान लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे. या देशात वन नेशन वन पार्टी आणू पाहतात,

या देशात हुकूमशाही येऊ देणार नाही, याकरिता मतभेद, विसरून इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या निवडणुकीत भाजप सत्तेत आली तर 2024 नंतर निवडणुकाच होणार नाही. अशी भीती गीते यांनी व्यक्त करताना ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. असे सांगितले.

मणिपूर घटनेवर चुप्पी

मणिपूरच्या हिंसाचारामुळे आणि पंतप्रधान यावर गप्प बसल्यामुळे देशातील आदिवासी बांधव अस्वस्थ , नाराज आहे. भाजपचे सरकार असून एक शब्द बोलत नाहीत. या देशात कुणी सुरक्षित नाही, बेरोजगारी वाढली आहे, महागाई चा आगडोंब उसळला आहे. आता येथील तरुण इंडिया आघाडीलाच मतदान करणार असल्याचा विश्वास आहे.

गरीबांची फसवणूक व चेष्टा

भाजप सरकार गोरगरिबांची फसवणूक चेष्टा करीत आहे. फसव्या जाहिरातीला आपण भुलतो, फसव्या घोषणा आणि जाहिरातींना पुन्हा बळी पडू नका. असे अनंत गीतेंनी आवाहन केले. काँग्रेसचा कार्यकर्ता सांगतोय अनंत गीते यांना मत म्हणजे राहुल गांधी यांना मत हे परिवर्तन स्वागतार्ह आहे. असे अनंत गीते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.