Loksabha Election : लोकसभेसाठी 'हा' बडा नेता पुन्हा मैदानात; 'शेकाप'च्या मदतीनं आजमावणार नशीब, NCP नेत्याविरुद्ध रंगणार सामना?

तटकरेंसह राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपबरोबर गेले.
Anant Geete LokSabha Election
Anant Geete LokSabha Electionesakal
Updated on
Summary

रायगडमधून महाविकास आघाडीतर्फे सुनील तटकरे यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता मानली जात होती.

चिपळूण : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. शेकापच्या मदतीने ते पुन्हा या मतदारसंघात नशीब आजमावणार आहेत.

खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये त्यांनी पुढील महिन्यात मेळाव्यांचे नियोजन केले आहे. गीते यांनी रायगड लोकसभा मतदार संघातून (Raigad Constituency) राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात मागील निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गीते राजकारणात सक्रिय नव्हते.

Anant Geete LokSabha Election
Satish Jarkiholi : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या घडामोडी; भाजप-धजदला बसणार दणका? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे पुढील निवडणुकीत गीते यांना संधी मिळणार नाही. रायगडमधून महाविकास आघाडीतर्फे सुनील तटकरे यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता मानली जात होती.

एक वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनंत गीते राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी रायगडसह मुंबईमध्ये पक्षाचे मेळावे घेत कार्यकर्त्यांशी संपर्क मोहीम सुरू केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला असला तरी कार्यकर्ते आपल्याबरोबर राहतील. मित्रपक्षाबरोबर आघाडी न करता स्वतंत्र निवडणूक लढवावी, असा आग्रह गीते यांचा नेहमी होता; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये फूट पडली.

Anant Geete LokSabha Election
Prithviraj Chavan : गद्दारांना हाताशी धरून मोदी सरकारनं महाराष्ट्र लुटलाय; माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

तटकरेंसह राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपबरोबर गेले. त्यामुळे गीते यांचा रायगडमधील लोकसभेच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड लोकसभा मतदार संघात गीते यांचा कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या मतदारसंघात शेकापची ताकद आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी तसेच खासदार तटकरे यांनी पक्षाबरोबर गटारी केली आहे; मात्र कार्यकर्ते आणि मतदार अजूनही पक्षाबरोबर एकनिष्ठ असल्याचा दावा केला जात आहे.

Anant Geete LokSabha Election
Almatti Dam : 'ही' दोन धरणं सांगली-कोल्हापूरसाठी धोक्याची, कृष्णा खोऱ्यालाही महापुराचा धोका; कृती समितीचं CM शिंदेंना आवाहन

या सर्व जमेच्या बाजू गृहित धरून गीते पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. नुकतेच त्यांनी पाली ( रायगड ) येथील बल्लाळेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन आपल्या निवडणुक प्रचाराला सुरवात केली. पालीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

फुटलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर त्यांनी जोरदार टीका केली. आता त्यांचे लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्यावर आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये पुढील महिन्यात गीते यांनी मेळाव्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहे.

Anant Geete LokSabha Election
Loksabha Election Update : पक्षांतर करणाऱ्यांची काळजी करू नका, गेले तर काँग्रेसमध्ये जाऊ देत; भाजपच्या वरिष्ठांकडून सक्त सूचना

खासदार सुनील तटकरे यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते भाजपबरोबर गेले. त्यांनी निवडणुकीला उभे राहू नये. जर का ते उभे राहिले तर मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. पुढील महिन्यात मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. माझा लोकसभेचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे.

- अनंत गीते, माजी खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.