देवगडमधील शिरगावात सापडले प्राचीन कातळचित्र; हत्तीचे पाय अन् वाघाच्या जबड्याप्रमाणे दिसते चित्र, पण..

देवगड तालुक्यातील शिरगावजवळ कातळचित्र (Katal Shilp Kokan) सापडले आहे.
Katal Shilp Kokan
Katal Shilp Kokanesakal
Updated on
Summary

‘कातळचित्रामुळे शिरगावचे नाव प्रथमच कातळचित्र पर्यटनाच्या नकाशावर झळकले आहे. इथल्या कातळावर पूर्ण वर्तुळ कोरले असून एका बाजूला त्याला एक टोक काढले आहे.'

देवगड : तालुक्यातील शिरगावजवळ कातळचित्र (Katal Shilp Kokan) सापडले असून या भागातील असा हा पहिलाच प्राचीन ठेवा आहे. या कातळचित्राची येथील देवगड इतिहास संशोधन मंडळाने (Devgad History Research Board) पाहणी करून त्याठिकाणची जागा स्वच्छ करण्यात आली आहे. यामुळे शिरगावचे नाव कातळचित्र पर्यटनाच्या नकाशावर झळकले असल्याचा विश्वास अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी तालुक्यातील साळशी येथे उभ्या दगडावरील काही जंगली प्राण्यांची कातळचित्रे (Wild Animal Katal Shilp) सापडली होती. त्यानंतर शिरगाव भागातही कातळचित्र असल्याची माहिती देवगड इतिहास संशोधन मंडळाला समजली होती. त्यानुसार पाहणी करण्यात आली. कातळचित्र एका उतारावर असल्याने या चित्रावर बरीच दगड माती साचली होती. त्यानुसार कुदळ, घमेली, फावडी, झाडू आदी सर्व साहित्याची जमवाजमव करून हे कातळचित्र साफ करण्याचे काम संशोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.

Katal Shilp Kokan
Raghuveer Ghat : दाट धुक्याने वेढलेल्या रघुवीर घाटाने पांघरला 'हिरवा शालू'; निसर्ग सौंदर्यात 27 हून अधिक धबधब्यांची भर

नेहमीप्रमाणे आवश्यक ती मोजमापे घेण्यात आली, रेखाचित्रे व छायाचित्रण करण्यात आले. त्यानंतर या चित्राभोवती दगडाचा गोल रचण्यात आला आहे. त्यामुळे हे चित्र आता सर्वांच्या चटकन लक्षात येईल. या शोध मोहिमेत हिर्लेकर व अजित टाककर यांच्या समवेत लक्ष्मण पाताडे, किरण पांचाळ, आदित्य हिर्लेकर यांचा सहभाग होता.

असे आहे कातळचित्र

अभ्यासक हिर्लेकर म्हणाले, ‘कातळचित्रामुळे शिरगावचे नाव प्रथमच कातळचित्र पर्यटनाच्या नकाशावर झळकले आहे. इथल्या कातळावर पूर्ण वर्तुळ कोरले असून एका बाजूला त्याला एक टोक काढले आहे. एखाद्या बदामच्या पानाप्रमाणे ही रचना आहे. २२ बाय २४ फुट मापाची ही एखाद्या लॉकेटप्रमाणे व्यवस्थित रचना कोरलेली आहे. याच्या आतमध्ये दोन वाघ पाठीला पाठ लावून कोरले आहेत.

Katal Shilp Kokan
आयुष्यमान भारत, फुले जनआरोग्य योजनेचा सीमाभागातील 865 गावांना होणार लाभ; 1,356 आजारांवर मोफत उपचाराची सोय

दोन्ही वाघांच्या शेपट्या समांतर लॉकेटच्या कोनात आणून एकमेकांना जोडलेल्या आहेत. दोन्ही वाघांचे दोन दोन पाय हे प्रमाणापेक्षा थोडे जाडच आहेत. त्यामुळे ते हत्तीच्या पायासारखे वाटतात. तोंडाचा भाग हा वाघाच्या जबड्याप्रमाणे दिसतो; पण, या तोंडाच्या वरच्या बाजूला रचना थोडीशी वेगळी दिसते. वाघाचे पाय वगळता बाकी सर्व भाग हा प्रमाणबद्धरितीने कोरलेले आहेत.

या कातळचित्रांचे रहस्य उलगडण्यासाठी आवश्यक अभ्यास करण्यात येईल. अतिशय मोठ्या आकाराचे चित्र असल्यामुळे जमिनीवरून त्याचे नीट छायाचित्र काढता येत नाही. भविष्यात कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ यांच्या वतीने परिसरातील गावात आणखीन शोध मोहीम राबवली जाणार आहे.

-रणजित हिर्लेकर, कातळचित्र अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.