कोकणातील पांडवकालीन टाकेश्वर मंदिराच्या खोदकामात सापडल्या ऐतिहासिक वीरगळ, सतीशीळा; दगडावर कशाची आहे मूर्ती?

कोकणात आढळणाऱ्या वीरगळ या काळ्या दगडावरील शिल्पासंबंधी विविध मान्यता आहेत.
Mandangad Takeshwar Temple
Mandangad Takeshwar Templeesakal
Updated on
Summary

टाकवली येथील शंकराचे मंदिर हे सर्वात जुने म्हणजे पांडवकालीन असल्याची ग्रामस्थांची मान्यता आहे.

मंडणगड : तालुक्यातील टाकवली येथील भगवान शिवशंकराचे पुरातन पांडवकालीन टाकेश्वर मंदिराचे (Takeshwar Temple) इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी सुरू असलेल्या खोदकामात वीरगळ, सतीशिळा व पांडवकालीन (Pandava) मंदिराच्या पूर्वी अस्तिस्वात असलेल्या मंदिराचे भग्न अवशेषही येथे काम करत असलेल्या ग्रामस्थांना आढळून आले. मूर्तींना पाण्याने धुवून काढले असता त्या उजळून निघाल्या आहेत.

सापडलेल्या मूर्ती मंदिरात ठेवून त्यांचे जतन करून हा प्राचीन पुरातन ठेवा येणाऱ्या पिढीस पाहता यावा, त्यातून आपली संस्कृती समजावून घ्यावी, या हेतू उद्देशाने संरक्षित करण्यात येणार असल्याची माहिती टाकवली ग्रामस्थांनी दिली.

Mandangad Takeshwar Temple
साताऱ्यातील वाईत आढळली 13 व्या शतकातील 'गद्धेगळ शिळा'; इतिहासात 'गद्धेगळ'चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

महाशिवरात्री (Mahashivratri) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर टाकवली येथील उंच टेकडीवर वसलेल्या भगवान शिव शंकरांचे मंदिराचे जुने बांधकाम तसेच ठेवून बाजूने नूतनीकरणाचे काम ग्रामस्थांनी सुरू केले आहेत. या निमित्ताने करण्यात आलेल्या खोदकामात कोकणातील मंदिराच्या परिसरात सापडणाऱ्या काळ्या दगडावर कोरलेल्या मूर्तीचे दोन नमुने ५ जानेवारीला सापडले आहेत.

Mandangad Takeshwar Temple
Mandhardev Kalubai : मांढरदेव-काळेश्वरी देवीचे मंदिर पाच दिवस राहणार बंद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, काय आहे कारण?

यात विरांच्या स्मरणात काळ्या दगडावर कोरण्यात येणारी वीरगळ व सती जाणाऱ्या स्त्रियांच्या स्मरणातील सतीशिळाही आढळून आली आहे. कोकणात आढळणाऱ्या वीरगळ या काळ्या दगडावरील शिल्पासंबंधी विविध मान्यता आहेत. यात शिल्प अभ्यासकांमध्ये काही मुद्द्यांवर साम्य असले तरी माहितीचे सादरीकरण मात्र वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. टाकवली येथील शंकराचे मंदिर हे सर्वात जुने म्हणजे पांडवकालीन असल्याची ग्रामस्थांची मान्यता आहे. याशिवाय मूर्ती संदर्भातही गुराखी व गाईची आख्यायिका सर्वमान्य आहे.

Mandangad Takeshwar Temple
कोल्हापुरात 'उदं गं आई उदं'च्या गजरात सौंदत्ती रेणुका देवीची आंबिल यात्रा; काय आहे यात्रेची खासियत?

या संदर्भातील लोकमान्यता व उपलब्ध माहितीचे संदर्भ जोडता पांडवांच्या आधीही येथे शंकराची मूर्ती व मूर्तीचे संरक्षणासाठी छोटे मंदिर असल्याची बाब या निमित्ताने पुढे येत आहे. दोन भिन्न कालखंडातील धागे एकमेकांशी जुळवत या संदर्भातील विश्वसनीय माहिती पुढे आणण्यासाठी मंदिर परिसरात खोदकाम करत असताना नव्याने सापडलेल्या मूर्तीचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. त्यातून मानवी संस्कृतीचे अस्तित्वाचे भूतकाळातील खुणांच्या संशोधनात्मक अभ्यासाची आवश्यकता नव्याने अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.