Angarki Chaturthi : गणपतीपुळेला जात असाल, तर ही बातमी महत्त्वाची; समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना असणार बंदी, काय आहे कारण?

अंगारकी चतुर्थीनिमित्त (Angarki Chaturthi 2024) गणपतीपुळे येथील श्रींच्या दर्शनाला आज मंगळवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.
Angarki Chaturthi 2024 Ganpatipule
Angarki Chaturthi 2024 Ganpatipuleesakal
Updated on
Summary

गणपतीपुळे परिसरात बाहेरगावचे व्यावसायिक आले असून, त्यांनी दुकानेही थाटली आहेत.

रत्नागिरी : अंगारकी चतुर्थीनिमित्त (Angarki Chaturthi 2024) गणपतीपुळे येथील श्रींच्या दर्शनाला आज मंगळवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. ही वर्षातील एकच अंगारकी असल्यामुळे चाळीस हजारांहून अधिक भक्त दर्शनासाठी येतील, असा अंदाज असल्यामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे. तसेच समुद्र खवळलेला असल्यामुळे किनाऱ्यावर पोलिसांची करडी नजर राहणार असून पर्यटकांना (Ganpatipule Tourism) किनाऱ्यावर सोडण्यात येणार नाही. त्यासाठी किनाऱ्यावर पोलिसांची गस्त ठेवण्यात येणार असून १५ जीवरक्षकही नेमण्यात आले आहेत.

अंगारकीला होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मागील आठवड्यात गणपतीपुळे येथे सर्व शासकीय यंत्रणा, पोलिस, ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यामध्ये विविध सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासन अंगारकीसाठी सज्ज झाले आहे. सोमवारपासूनच भाविक गणपतीपुळ्यात दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

Angarki Chaturthi 2024 Ganpatipule
Konkan Tourism : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटकांची संख्या रोडावली; काय आहे कारण?

गणपतीपुळे देवबाग या ठिकाणी पत्र्याचा मांडव बांधण्यात आला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन दर्शनरांगांच्यावर पत्रे टाकण्यात आले आहेत. तसेच गणपतीपुळे परिसरात बाहेरगावचे व्यावसायिक आले असून, त्यांनी दुकानेही थाटली आहेत. पाऊस कमी राहिला तर तीस ते चाळीस हजार भाविक गणपतीपुळेत दाखल होतील, असा अंदाज आहे.

Angarki Chaturthi 2024 Ganpatipule
Wild Animal : अनेक प्रदेशांत लांडग्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली, अस्तित्वासाठी करावा लागतोय असंख्य धोक्यांचा सामना!

त्यानुसार जयगडचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि मागवलेल्या जादा पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चौकाचौकात ग्रामपंचायत व देवस्थानने विजेची व्यवस्था केली आहे. वाहने पार्किंगसाठी सागरदर्शन येथे व्यवस्था केलेली आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना जाता येऊ नये यासाठी दोरी बांधण्यात आली आहे.

सायंकाळी मिरवणूक

अंगारकी उत्सवानिमित्त संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्यावतीने सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणामार्गे ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत देवस्थान समितीचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर व त्यांचे सर्व पंच, मुख्य पुजारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व भाविक सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.