Ganpatipule Temple : कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणार प्रचंड गर्दी; 'हे' आहे खास कारण

अंगारकी उत्सवाला घाटमाथ्यावरील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात.
Angarki Sankashti Ganpatipule Temple in Konkan
Angarki Sankashti Ganpatipule Temple in Konkanesakal
Summary

अंगारकी दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी होणार असल्यामुळे त्या दिवशी सर्वच यंत्रणा सतर्क राहणार आहेत. समुद्रात भाविकांनी जाऊ नये अशा सूचना देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

रत्नागिरी : कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील मंदिरात (Ganpatipule Temple) २५ जूनला अंगारकीनिमित्त (Angarki Sankashti) दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, मंदिरामध्ये दर्शनरांगांच्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच समुद्र खवळलेला असल्यामुळे पोलिस, जीवरक्षकांचे विशेष लक्ष किनाऱ्यावर राहणार आहे.

अंगारकी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिर विशेष बैठक घेतली. या बैठकीला देवस्थान समितीचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर, सचिव विनायक राऊत, पंच विद्याधर शेंडे, डॉ. अमित मेहेंदळे, नीलेश कोल्हटकर आदींसह गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्कये, जयगड पोलिस ठाण्याचे कुलदीप पाटील व विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Angarki Sankashti Ganpatipule Temple in Konkan
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होताच सरकारनं घेतली महत्त्वाची भूमिका; CM शिंदे म्हणाले, 'हा प्रकल्प जनतेवर थोपविणार...'

अंगारकी उत्सवाला घाटमाथ्यावरील भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, इचलकरंजी, कवठेमहांकाळ, मिरज, कऱ्हाड, इस्लामपूर आदी ठिकाणचे भाविक श्रींच्या दर्शनासाठी येतात. यंदा पावसाळ्यात आलेल्या या अंगारखीच्या दिवशी जर पाऊस पडला नाही, तर मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्यामुळे गणपतीपुळे परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान समिती, एमटीडीसी, महावितरण, एसटी विभाग, वाहतूक विभाग, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभागाला प्रांताधिकारी देसाई यांनी या बैठकीत विशेष सूचना दिल्या आहेत.

Angarki Sankashti famous Ganpatipule temple in Konkan
Angarki Sankashti famous Ganpatipule temple in Konkanesakal

ही अंगारकी पावसाळ्याच्या तोंडावर असल्यामुळे त्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या व समुद्रस्नानास उतरणाऱ्या सर्वच भाविक व पर्यटकांना खबरदारीच्या सूचना देऊन दुर्घटना टाळण्यासाठी सर्वच यंत्रणांनी सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे. या दिवशी वॉटरस्पोर्टस् निमित्ताने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर कार्यरत राहणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांमधील एक ते दोन बोटी तैनात करण्यात याव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत.

Angarki Sankashti Ganpatipule Temple in Konkan
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करत असाल, तर ही बातमी महत्त्वाची! 'या' घाटातील संरक्षण भिंत कोसळली

दरम्यान, गणपतीपुळे परिसराला आता अंगारकीचे वेध लागले असून, मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित मिळावे यासाठी दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात येणार आहे. येथील प्रत्येक चौकामध्ये विजेचे दिवे लावण्यात येणार आहेत. सागरदर्शन पार्किंगच्या राखीव क्षेत्रात गाड्या लावण्याची व्यवस्था करण्यात आली असून, गणपतीपुळे पोलिस प्रशासन तिथे नजर ठेवणार आहे. समुद्रातील धोक्याची पातळी लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि एखादी जेटस्की सज्ज ठेवण्यात येणार आहे.

अंगारकी दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी होणार असल्यामुळे त्या दिवशी सर्वच यंत्रणा सतर्क राहणार आहेत. समुद्रात भाविकांनी जाऊ नये अशा सूचना देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

-जीवन देसाई, प्रांताधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com