अपक्ष आपल्या मतावर ठाम राहिल्याने शिवसेनेत अखेर बंड झाले आहे.
दाभोळ : दापोली शिवसेनेमध्ये (Dapoli) सध्या गटबाजी सुरू झाली असून दापोली नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्रे माजी आमदार दळवी (Surykant dalavi) यांच्या हाती गेल्यानंतर काही शिवसैनिकांनी (Shivsena) अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. हे अर्ज मागे घेतले जावेत, म्हणून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करण्यात आले. मात्र, अपक्ष आपल्या मतावर ठाम राहिल्याने शिवसेनेत अखेर बंड झाले आहे.
शिवसैनिकांनी काल (१५) रोजी जालगांव येथील श्री शैल सभागृह येथे जाहीर मेळावा घेतला. केळसकर नाका येथे शिवसेना व राष्ट्रवादी (NCP) यांची संयुक्त प्रचारसभा १४ डिसेंबरला झाली. यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करत, नव्या पदाधिकाऱ्यांच्या हंगामी नियुक्त्या जाहीर केल्या. या घटनेनंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हा मेळावा घेतला. तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे म्हणाले की, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. शिवसेना व राष्ट्रवादी असे समीकरण तालुक्यात होणे, हे आम्हाला मान्य नाही. (Nagar panchayat Election 2021) असे समीकरण करायचे होते तर तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेणे गरजेचे होते.
प्रदीप सुर्वे पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षात झालेल्या विकासकामांमुळे आमचा विजय निश्चित आहे. आम्हाला विजय मिळाला तर आपल्याला तालुक्याच्या राजकारणात वाव मिळणार नाही, हे विरोधकांच्या लक्षात आल्यानेच कुटील निती वापरून सध्या राजकारण सुरू असून शिवसैनिकाला हे मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
मातोश्रीमुळे दळवींना स्वीकारले
२५ वर्षे आमदार असलेल्या माजी आमदार दळवींना केवळ मातोश्रीचा आदेश म्हणून आम्ही स्वीकारले. कोणीही गटातटाचे राजकारण केले नाही; मात्र २५ वर्षानंतर प्रदीप सुर्वे नको, तर कधी भगवान घाडगे नको, असे राजकारण दळवींनी सुरू केले. तरीही आम्ही २०१४ ची निवडणूक हिरीरिने लढलो. दळवींनी पराभवाचे खापर अन्यांवर फोडले, असे सुधीर कालेकर यांनी सांगितले.
परब यांना तो अधिकार नाही
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर म्हणाले की, आमची लढाई ही विचारांची लढाई असून सेनाविरुद्ध सेना अशी नाही. मी उपजिल्हाप्रमुख हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार झालो असून मला या पदावरून हटविण्याचा अधिकार अनिल परब यांना नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून जेथे अन्याय झाला आहे, तेथे आवाज उठवण्याचा धडा त्यांनी आम्हाला दिला आहे. संघटनेतील सर्व शिवसैनिक आज आम्हा पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम आहेत. आम्ही आता रडणार नाही तर लढणार आहोत व लढाई जिंकूनच बाळासाहेबांचा शिवसैनिक शांत बसेल.
९ जागा समीकरण नाही पटले
प्रदीप सुर्वे म्हणाले, दापोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला असताना शिवसेनेला ८ जागा तर जे सातत्याने ६ जागांच्यावर कधीही विजयी झाले नाहीत, त्यांना ९ जागा हे समीकरण आम्हाला पटलेले नाही. त्यातच शिवसेनेच्या हमखास निवडून येणाऱ्या जागा राष्ट्रवादीला दिल्या गेल्या, हे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासारखे आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त जागा या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लढवणार असे निश्चित केले.
* शिवसैनिकांचे अपक्ष अर्ज कायम
* वरिष्ठांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही
* राष्ट्रवादीसोबत युती अमान्य
* बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीसमोर झुकले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.