अणसुरेची जैवविविधता’ आता एका क्लीकवर

संकेतस्थळ विकसित; जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
Ansure Biodiversity now a click away
Ansure Biodiversity now a click away sakal
Updated on

राजापूर : निसर्गसंपदेची माहिती व्हावी या उद्देशाने तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीतर्फे अणसुरे जैवविविधता या नावाचे लोकजैवविविधता संकेतस्थळ विकसित केले आहे. गावच्या जैवविविधततेचे संकेतस्थळ विकसित करणारी अणसुरे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. वाढत्या शहरीकरणासह विविध कारणांमुळे निसर्गसाखळीचा अविभाज्य घटक असलेली निसर्गसंपदा नष्ट होऊ लागली आहे. त्यातून, पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. अशा स्थितीत पर्यावरणाचा समतोल पूर्वीप्रमाणे कायम राहण्यासाठी निसर्गसंपदेचे जतन व्हावे, त्यासाठी जनजागृती व्हावी आणि लोकांना माहिती मिळावी म्हणून ‘अणसुरे जैवविविधता’ हे संकेतस्थळ बनवण्यात आले. या संकेतस्थळाचा आमदार राजन साळवी यांनी नुकताच आरंभ केला.

Ansure Biodiversity now a click away
कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

यामुळे अणसुरे गावची जैवविविधता आता जगाच्या नकाशावर येणार आहे. जैविक विविधता कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावच्या जैवविविधतेची नोंदवही तयार करून त्यामध्ये गावात आढळणार्‍या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक व अन्य जीवजातींची व त्या संबंधी ग्रामस्थांना असलेल्या पारंपरिक ज्ञानाची नोंद करणं अपेक्षित आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींकडून जैवविविधता नोंदवह्या तयार केल्या आहेत; मात्र, गावच्या जैवविविधतेची माहिती डिजिटल स्वरूपामध्ये एकत्र करून ती वेबसाइटच्या रूपाने प्रकाशित केलेली नाही. तो उपक्रम अणसुरे ग्रामपंचायतीने राबवला आहे. काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर लवकरच ही वेबसाइट गुगलवर सर्वांना पाहण्यासाठी लवकरच खुली होणार असल्याची माहिती हर्षद तुळपुळे आणि ग्रामविकास अधिकारी राऊत यांनी दिली.गावातील प्रजातींचे असलेले प्रमाण विपुल प्रमाणात की तुरळक प्रमाणात आहेत याबाबतच्या सविस्तर नोंदी आणि माहिती या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्याचवेळी या संकेतस्थळावर गावच्या जैवविविधतेसंबंधी व्हिडिओही प्रकाशित करण्यात आले आहेत.

Ansure Biodiversity now a click away
कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल

या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, पंचायत समितीच्या सभापती करूणा कदम, सरपंच रामचंद्र कणेरी, उपसरपंच प्रांजली गावकर, शिवेसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत, कमलाकर कदम, अ‍ॅड. शशिकांत सुतार, गिरीष करंगुटकर, नंदू मिरगुले, आदी उपस्थित होते.

संकेतस्थळावर मिळणार ही माहिती

  • स्थानिक वृक्ष, वेलवर्गीय व अन्य वनस्पती,

  • मासे, कीटक, पक्षी इत्यादी जैवविविधता

  • या साऱ्याची फोटोसहित माहिती

  • गावामध्ये प्राणी-पक्ष्यांचे महत्वाचे अधिवास

  • देवराईच्या रूपाने असलेले नैसर्गिक जंगल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.