राजापूर - कोकण परिसराला घाटमाथ्याशी जोडणार्या अणुस्कूरा घाटातील रस्त्यामध्ये मातीच्या ढिगार्यासोबत आलेल्या मोठमोठे दगडांनी रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्याच्या बांधकाम विभागाच्या प्रयत्नांना चांगलाच घाम फोडला आहे. मात्र, घाटरस्ता वाहतूकीसाठी मोकळा होण्यामध्ये अडथळा ठरणार्या या छोट्या-मोठ्या दगडांपैकी काही दगड फोडण्यात बांधकाम विभागाला यश आले आहे.