Chiplun Datta Temple : शांत...शांत...संवादासाठी श्रीक्षेत्र अवधूतवन!

महाराष्ट्रात एकूण गरम पाण्याचे ३२ झरे आहेत. त्यातील फक्त ८ झरे पठारी भागात आहेत.
Datta Mandir
Datta Mandiresakal
Updated on
Summary

एकाचवेळी स्वामी अवधुतानंद आणि डेव्हिड महाराज हे स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. इकडे आपोआप जीर्णोद्धारासाठी तयारी होऊ लागली.

-पराग वडके परशुराम, parag.vadake@gmail.com

बऱ्याच वेळा चिपळूण ते गोवा (Chiplun to Goa) प्रवास करताना मठ येथील श्री क्षेत्र अवधूतवन अशी पाटी असलेली कमान लक्ष वेधून घ्यायची; पण जायचा योग येत नव्हता. एक दिवस थोडा वेळ काढून आत जंगलात घुसलो. मुख्य महामार्गापासून १ किलोमीटरवर अवधूतवन दिमाखात उभे आहे. आत शिरताक्षणीच तुम्ही आणि श्री दत्तगुरू यांचा संवाद सुरू होतो. तुम्ही आस्तिक का नास्तिक असा सीमामार्ग बंद होऊन तिथला निसर्ग झटकन नजरबंदीचा खेळ सुरू करतो. पक्ष्यांच्या असंख्य शिळ तिथे स्पंदने तयार करतात. काजळी नदीचा गुंग करणारा प्रवाह, बाजूला बंधारा, औदुंबर आणि पादुका.. आणि शांत.. शांत..शांत... संवाद.

Datta Mandir
उद्योग साकारताना : 'जेवढा स्पष्ट, तेवढे उद्योगाचे उद्दिष्ट अधिक स्पष्ट'

श्रीदत्त पादुका जसजशा जवळ येतील तसा भक्तीचा बाजार आपले रेट वाढवत अत्त्युच्च पदाला पोहचवतो, असे नेहमी नृसिंहवाडी येथे निदर्शनास येते. अस्वच्छता तर शेवटपर्यंत पाठ सोडत नाही. या सर्वांतून सोडवणूक करायची असेल आणि ज्यांना श्री दत्तगुरूंच्या भक्तीत लीन व्हायचे असेल तर जिथे साक्षात श्री दत्तगुरूंनी स्वामी अवधुतानंद यांना साक्षात्कार देऊन सांगितले की, मी नृसिंहवाडीनंतर (Narsinhwadi Datta Mandir) येथे सतत वास करत असेन असे ठिकाण म्हणजेच मुंबई-गोवा महामार्गावरचे पालीपासून ८ किलोमीटरवरील लांजा तालुक्यातील ‘मठ’ येथील श्रीक्षेत्र अवधूतवन. महाराष्ट्रात एकूण गरम पाण्याचे ३२ झरे आहेत. त्यातील फक्त ८ झरे पठारी भागात आहेत.

Datta Mandir
आईला मदत करता-करता ती 'त्या' विश्वात कधी गुंतून गेली हे तिलाही कळत नाही!

सगळे कोकणात (Konkan) आणि वैशिष्ट्य म्हणजे ते दक्षिणोत्तर असे आहेत. काही वर्षांपूर्वी येथील सरपंच सुभाष पवार हे त्यांच्या गुरांना घेऊन पाण्यासाठी नेहमीच्या जागेवर गेले असताना तेथे एक महाराज आणि बरोबर महाराष्ट्रातील नामवंत दोन-तीन नेते बरोबर होते. सुभाष पवार यांनी त्यांना या वेळी जर हटकले आणि विचारले आपण कोण, कुठून येतो, का येता त्या वेळी असे कळले की, प्रसिद्ध दत्तभक्त डेव्हिड महाराज आहेत. सोबत जे प्रसिद्ध नेते होते त्यापैकी एक नुकतेच कर्करोगाने निधन पावले नंतर महाराज अवधुतानंद एक दिवस तेथे आले आणि गावकऱ्यांना जमवले. तीन फुले घेतली, डोळे मिटले आणि नदीच्या तीन वेगवेगळ्या भागात ती फुले टाकली. मिनिटात त्या तीन फुलांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येऊन जेथे गरम पाण्याचा झरा होता तेथे गोल फेरा धरला.

स्वामींनी शांत स्वरात गावकऱ्यांना सांगितले की, श्री दत्तगुरूंची ही जागा स्नानाची आहे आणि जो औदुंबर आहे तिथे ध्यानाची जागा आहे. गावकऱ्यांकडे सदर जागा साफ करून मागितली. योगायोगाने ती जागा गावचे सरपंच सुभाष पवार यांची होती. मग साफसफाई झाली. स्वामी अवधुतानंदानी स्वतः दत्तपादुका तेथे बसवल्यानंतर डेव्हिड महाराज, सुभाष पवार त्यांच्या घरी महिनोन्‌महिने राहत ते सतत समाधीत असत. कधी खोदून खोदून काही विचारले की, एवढेच म्हणत "इथे मोठा अजगर आहे, तो त्रास देतो ना तुम्हाला म्हणून थांबलोय’, अशी अगम्य भाषा असे.

Datta Mandir
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात; बालमानस शास्त्राची जाण नसल्यामुळं उद्भवू शकतात समस्या!

एक दिवस अवधुतानंद आले. त्यांनी प्रवचन केले आणि गळ्यातील माळ आणि शाल सुभाष पवार यांच्या गळ्यात घातली आणि सांगितले, इथली काळजी घ्या. आमची जबाबदारी संपली. देवळाचा चांगला जीर्णोद्धार करा. पैशाची चिंता नको, असेही सांगितले. नंतर एकाचवेळी स्वामी अवधुतानंद आणि डेव्हिड महाराज हे स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. इकडे आपोआप जीर्णोद्धारासाठी तयारी होऊ लागली. कोणी सभामंडप बांधून दिला, कोणी नदीवर बंधारा बांधून दिला आणि एक सुंदर श्रीदत्त संवाद स्थान उभे राहिले. नृसिंहवाडीत जे जे विधी होतात ते सर्व इथे होतात. तुम्हाला निवास, न्याहारी, विधी करायचे असतील तर अगोदर सुभाष पवार यांच्याशी संपर्क करा कारण, दत्तस्थानापासून जवळ वस्ती नाही. श्री दत्तप्रभू आणि तुम्ही असा मूक संवाद तासनतास करायचा असेल तर या स्थानाला जरूर भेट द्या.

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()