अष्टविनायक तिर्थक्षेत्रांना देणार उत्तम सोयीसुविधा; डॉ. निलम गोऱ्हे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे सोमवार पर्यंत (ता.13) अष्टविनायक दौऱ्यावर होत्या.
Neelam Gorhe
Neelam GorheSakal
Updated on

पाली - विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे सोमवार पर्यंत (ता.13) अष्टविनायक दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान रविवारी (ता. 12) अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अष्टविनायक तिर्थक्षेत्रांना आणखी उत्तम सोयीसुविधा देऊन त्यांचा विकास करणार असल्याचे सांगितले.

यावेळी गोऱ्हे यांचा श्री बल्लाळेश्वर देवस्थानाच्या वतीने सन्मान करण्यात आला. डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की महाराष्ट्र व देश कोरोना पासून मुक्त व्हावा असे साकड श्री बल्लाळेश्वरला घातले आहे. तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला अधिकाधिक धैर्य व शक्ती द्यावी अशी श्री बल्लाळेश्वर चरणी प्रार्थना केली. अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संदर्भात गेली दोन वर्ष मला स्वतः येता आले नाही. तरी, मी तीन बैठका गेल्या काळात घेतल्या आहेत.

Neelam Gorhe
हर्णे : शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

त्यामध्ये येथील रस्त्याचा प्रश्न, पाणी, भक्तनिवास, अन्य सोयी सुविधांचा जो विषय प्रलंबित आहे तो लवकरच मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करतेय. रस्त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेणार आहे. इतर प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधितांनी पत्र द्यावे जेणेकरून या सर्व बाबींचा पाठपुरावा करता येईल. तसेच कोरोना काळात रस्त्यांची कामे का झाली नाहीत अशी विचारणा रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांना करणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. नवीन वर्षात भक्तांना अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतील असे यावेळी त्यांनी आश्वासित केले.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, राजेंद्र राऊत, अनुपम कुलकर्णी, सचिन जवके, संजय म्हात्रे, दादू गोळे, सचिन डोबले, किशोर खरीवले तसेच श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट उपसरपंच विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.