मंगळागौरी पूजेत पत्रीबरोबर अशा फुलांचाही समावेश करतात म्हणूनच या फुलांच्या रंगरूपाचा संबंध पार्वतीच्या सौभाग्य अलंकारांशी लावून ग्रामीण भागात अनेक नावं या फुलांना मिळतात.
संगमेश्वर : संकटग्रस्त प्रजाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्निशिखा (Agnishikha) या वनस्पतीची फुले हिरव्यागार जाळ्यांमधून डोकावू लागली आहेत. उन्हाळ्यात पळस फुलल्यानंतर त्याचे वर्णन ‘वनज्योत’ असं केले जाते. या वनस्पतीची फुले पिवळ्या केशरी आणि लाल या रंगांनी निसर्गात खऱ्या अर्थाने बहर आणते. अग्निशिखाच्या रंग आणि विशिष्ट आकारामुळे या फुलांकडे सहजच लक्ष वेधून घेतले जाते.