Ayodhya Ram Mandir : अटकेत असतानाच केला श्रीराम याग; कारसेवक मधू आठल्येंनी जागविल्या बंदिवासातल्या आठवणी

सहा कारसेवकांचा देवरूख येथे माणिक चौकात जनतेने केलेला हृद्य सत्कार आजही आठल्ये यांना आठवतो.
Ayodhya Ram Mandir Inauguration Karsevak Madhu Athalye
Ayodhya Ram Mandir Inauguration Karsevak Madhu Athalyeesakal
Updated on
Summary

आठवडाभर तुरुंगात राहिल्यावर माणिकपूर येथूनच सर्व कारसेवकांना ट्रेनने परत पाठवण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष अयोध्येत जाता न आल्याची खंत मधू आठल्ये यांनी व्यक्त केली.

साखरपा : अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir Inauguration) होत असताना भडकंबा येथील निवृत्त शिक्षक मधू दत्तात्रय आठल्ये यांनी पहिल्या कारसेवेच्या (Karsevaks) आठवणी जागविल्या. तेव्हा अटकेत असताना बंदिवासात श्रीराम याग केल्याचे त्यांनी सांगितले. ३४ वर्षांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

Ayodhya Ram Mandir Inauguration Karsevak Madhu Athalye
तब्बल 25 हजार चौरस फूट जागेत साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिअयोध्या; 167 खांब, 20×39 चा गाभारा अन् बरंच काही..

मधू आठल्ये (Karsevak Madhu Athalye) हे देवळे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून असताना त्यांना १९९० साली झालेल्या पहिल्या कारसेवेत कारसेवक म्हणून जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी संगमेश्वर तालुक्यातून गेलेल्या सहा कारसेवकांचा देवरूख येथे माणिक चौकात जनतेने केलेला हृद्य सत्कार आजही आठल्ये यांना आठवतो. प्रत्यक्षात आठल्ये यांना अयोध्येला पोहोचता आले नाही. त्याआधीच मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशच्या सीमेवरील माणिकपूर या गावी त्यांना अटक झाली.

राज्यातील सर्व तुरुंग आधीच कारसेवकांनी भरून गेल्यामुळे एका शाळेत तात्पुरत्या उभारलेल्या तुरुंगात डांबण्यात आले. गावाजवळूनच शरयू नदी वाहते. त्या नदीत तेव्हा कारसेवकांची २०० प्रेते मिळाल्याची आठवण मधू आठल्ये सांगतात. मधू आठल्ये यांच्याबरोबर साखरपा येथून गेलेले धनंजय आठल्ये हे कारसेवकही होते. अयोध्येत पोहोचणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर तुरुंगात असताना काय करायचे या विचारातून तुरुंगातच श्रीराम याग करण्याचे ठरले. कोल्हापूर येथून सपत्नीक आलेले कारसेवक बाजीराव घोरपडे यांना पत्नीसह यागासाठी बसविल्याचे धनंजय आठल्ये म्हणाले.

Ayodhya Ram Mandir Inauguration Karsevak Madhu Athalye
'यशाला शॉर्टकट नाहीच'! MPSC मध्ये प्रथम आलेल्या विनायक पाटलांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला 'हा' मोलाचा सल्ला

यागासाठी आवश्यक यज्ञ साहित्य स्थानिकांकडून मिळविल्याचे ते म्हणाले. त्यावेळी तुरुंगात तैनात असलेले पोलिसही बहुतांश हिंदू असल्याने त्यांनीही यागात छुपा सहभाग घेतल्याचे मधू आठल्ये सांगतात. आठवडाभर तुरुंगात राहिल्यावर माणिकपूर येथूनच सर्व कारसेवकांना ट्रेनने परत पाठवण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष अयोध्येत जाता न आल्याची खंत मधू आठल्ये यांनी व्यक्त केली. परत आल्यावर मात्र कारसेवेत सहभागी झाल्याचा ठपका ठेवत मधू आठल्ये यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्याविरुद्ध कोर्टात दाद मागून त्यांनी आपली नोकरी पुन्हा मिळवली.

Ayodhya Ram Mandir Inauguration Karsevak Madhu Athalye
प्रभू श्रीरामांच्या गाण्यावर खासदार महाडिकांनी धरला ठेका; मालोजीराजेंच्या गळ्यातील भगव्या स्कार्फनंही वेधलं लक्ष

कन्नड भाषिकांची घोषणा आजही पाठ

तुरुंगात सर्व राज्यातून आलेले कारसेवक एकत्र होते. कन्नड भाषिक कारसेवक तेव्हा एक घोषणा सतत देत असत. कट्टीवेवो, कट्टीवेवो, राममंदिर कट्टीवेवो ही ती घोषणा अर्थ माहिती नसला तरी आजही पाठ असल्याचे मधू आठल्ये सांगतात. बंदिवासात लिहिलेली डायरी आज अस्तित्वात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()