Bageshree and Guha Turtle
Bageshree and Guha Turtleesakal

टॅग लावून सोडलेल्या 'बागेश्री', 'गुहा' या दोन्ही कासवांचा उपग्रहाशी संपर्क तुटला; शोधण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न

गुहागर येथून फेब्रुवारी महिन्यात दोन्ही कासव टॅग लावून सोडण्यात आले होते.
Published on
Summary

फेब्रुवारी महिन्यात ऑलिव्ह रिडले मादी कासवांना महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते.

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्‍या ऑलिव्ह रिडले कासवांचा (Turtle) अभ्यास करण्याच्या उद्देशाने गुहागर येथून टॅग लावून सोडलेल्या ‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ या दोन्ही कासवांचा उपग्रहाशी संपर्क नुकताच तुटला आहे. त्यांच्याशी संधान बांधण्यासाठी कांदळवन कक्षाचे संशोधक (Kandalvan Researcher) प्रयत्न करत आहेत.

गुहागर येथून फेब्रुवारी महिन्यात दोन्ही कासव टॅग लावून सोडण्यात आले होते. त्यातील बागेश्री हे कासव पश्‍चिम बंगाल नजीकच्या समुद्रात पोहोचले होते. हे दोन्हीही कासव २२५ दिवस उपग्रहाशी संपर्कात होते. त्यानंतर सप्टेंबरच्या तिसऱ्‍या आठवड्यात ते संपर्क क्षेत्राबाहेर गेले आहेत.

Bageshree and Guha Turtle
वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती आता WhatsApp वर कळवा; 'महावितरण'चे नागरिकांना आवाहन

‘गुहा’चा २१ सप्टेंबर, तर ‘बागेश्री’चा २३ सप्टेंबरपासून प्रतिसाद मिळत नाही. समुद्रातील खारे पाणी आणि बदलते वातावरण याचा परिणाम होऊन ही यंत्रणा बिघडल्याची शक्यता कांदळवन कक्षाकडून वर्तवली आहे. लक्षद्वीपजवळच दीर्घकाळ फिरत असलेल्या गुहाच्या हालचालींवरून तिला तिथे चांगले खाद्य मिळाले असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती. २३ जुलैपासून गुहा कासविणीच्या सॅटेलाईट ट्रान्समीटरचा प्रतिसाद बंद झाला; पण, काही कालावधीने सिग्नल पुन्हा मिळू लागले.

मात्र, गुहा आणि बागेश्री यांचा सॅटेलाईट संपर्क आता पूर्णपणे तुटला असून, तो पुन्हा मिळवण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. याला कांदळवन कक्षाकडूनही दुजोरा मिळाला आहे. कोकणातील १३ किनाऱ्‍यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाच्या प्रजाती अंडी घालतात. विणीच्या हंगामात किनाऱ्‍यावर येणाऱ्‍या या मादी कासवांच्या अंड्यांचे नैसर्गिक तसेच मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्‍या नुकसानीतून संवर्धन करण्यासाठी गेली अनेक वर्षे हे काम सुरू आहे.

Bageshree and Guha Turtle
Kolhapur : डॉक्टर दाम्पत्याचं घर फोडून तब्बल 14 लाखांचा ऐवज लंपास; हिऱ्यांसह सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले

फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरीतील गुहागरच्या किनाऱ्‍यावर बागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले मादी कासवांना महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते. त्यांच्या प्रवासाकडे लक्ष ठेवणाऱ्या संशोधक आणि संवर्धकांना उपग्रहाद्वारे माहिती मिळत होती. डॉ. सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास सुरू होता.

Bageshree and Guha Turtle
Supreme Court : सरकारनं दिलेलं आरक्षण 'या' कारणामुळं सर्वोच्च न्यायालयातून रद्द; वक्कलिग, मराठा समाजात तीव्र नाराजी

असा झाला प्रवास

बागेश्रीने गोवा, कर्नाटक, कोची, केरळ तसेच पुढे नागरकाईलपर्यंत जात भारताचे दुसरे टोक गाठले. पुढे श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागरात प्रवेश केला. त्यानंतर काही दिवसांनी सॅटेलाईटद्वारे मिळणारे संकेत बंद झाले आहेत. वेगाने प्रवास करणाऱ्‍या बागेश्रीच्या हालचालींकडे पाहता, तिचा मार्ग आणि ती प्रवास करत असलेला परिसर व्यवस्थित माहिती असल्याची शक्यता संशोधकांकडून वर्तवली होती. गुहा या सॅटेलाईट टॅग लावलेल्या कासविणीने गोवा, कर्नाटकपासून लक्षद्वीप बेटांपर्यंतचा प्रवास केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.