"पंतप्रधान मोदी हे जागतिक नेते; उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडू नये"

पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवू नये
bal mane
bal maneesakal
Updated on

रत्नागिरी : कोरोना महामारीच्या संकटात धैर्याने तोंड देणारे, गरिबांना आधार देणारे आणि परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगली धोरणे राबवत आहेत. महात्मा गांधीजींनंतर सारा देश पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर टीका करून प्रसिद्धी मिळवू नका. उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असे प्रत्युत्तर माजी आमदार बाळ माने यांनी दिले.

आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कणकवली येथे मुख्यमंत्री पिंजर्‍यात बसलेत, मग पंतप्रधान मोदीसुद्धा तिथेच बसले आहेत, अशी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना बाळ माने म्हणाले, भारतात कोरोनाची सुरवात झाली तेव्हा त्याला धैर्याने तोंड देताना पंतप्रधान मोदी यांनी जनतेला मोठा आधार दिला. जनतेला आवाहन केले आणि प्रथम जनता कर्फ्यू यशस्वी झाला. जगातील भारतीयांची काळजी घेऊन ‘वंदे भारत’ योजना करून त्यांना सुखरूप भारतात आणले. ज्यावेळी लॉकडाऊन केला तेव्हा 20 लाख कोटीचे पॅकेज जनतेला दिले. कर्जाचे हप्ते भरण्यास सहा महिन्यांची सवलत दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयामुळे देशातील 80 कोटी जनतेला रेशनवर मोफत धान्य मिळाले. संशोधकांना प्रवृत्त केल्यामुळेच लस निर्मिती व तिचे वितरण सुरू केले. पंतप्रधान मोदी हे जागतिक नेते आहेत. त्यामुळे सामंत यांनी जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलनाच करायची असेल तर राज्याच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांशी करावी, पंतप्रधानांशी करू नये, याचे भान राखावे. उगाचच प्रसिद्धी मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींवर टीका करू नका. पंतप्रधानांचा आदर्श मुख्यमंत्र्यांनी घेतला असता तर सामान्य लोक मुख्यमंत्र्यांवर सोशल मीडियावर ज्या प्रकारे टीका करत आहेत, ती झाली नसती, असेही बाळ माने यांनी ठामपणे सांगितले.

Edited By- Archana Banage

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()