'रामदासांनी मिठी मारून शुभेच्छा दिल्या असत्या, तर आनंद झाला असता'

Narayan Rane
Narayan Raneesakal
Updated on

खेड : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी राज्याचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे नाव न घेता खेडचे मित्र भेटायला आले नाहीत, असा चिमटा काढला. ते आले असते आणि मला मिठी मारून शुभेच्छा दिल्या असत्या, तर निश्चित आनंद झाला असता; पण त्यासाठी मनाचा मनाचा मोठेपणा असावा लागतो. तो त्यांनी दाखवला नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केलीय.

Summary

कोकणातील तरूणांना सर्व ती मदत करण्यास मी सहकार्य करेन, असं आश्वासन मंत्री नारायण राणेंनी दिलं.

खेडचे मित्र जरी आले नाहीत, म्हणून काय झाले. दापोलीचे मित्र सूर्यकांत दळवी मला भेटायला आले. याचा मला आनंद आहे. ते माझ्यासोबत बराच वेळ आज दौऱ्यात होते. त्यानंतर ते जाताना मला म्हणाले, मी आता जातो तुम्हाला खेडचे मित्र भेटतील, पण खेडचे मित्र भेटले नाहीत, अशी भावनाही राणेंनी यावेळी व्यक्त केली. खेड भाजपतर्फे त्यांचे खेड भरणे नाका येथे रात्री सव्वा दहा वाजता ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, गुहागरचे माजी आमदार विनय नातु, खेड तालुका भाजपाध्यक्ष अनिल भोसले, शहराध्यक्ष अनिकेत कानडे, माजी अध्यक्ष संजय बुटाला, भूषण काणे, माजी नगराध्यक्ष आबा जोशी, अॅड. जाडकर महिला आघाडीच्या कार्यकर्त्या यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Narayan Rane
'अजित पवारांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही'; पडळकरांचा हल्लाबोल

यावेळी नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे काय, याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तसेच कोकणातील तरूणांना रोजगारांच्या विविध संधी या खात्याच्या माध्यमातून कशाप्रकारे मिळू शकतात, याबाबात सांगितले. सरकारच्या विविध योजनांचा उपयोग तरूणांनी केला पाहिजे व व्यवसाय करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. आपला देश, राज्याने देखील औद्योगिक क्रांतीत पुढे गेले पाहिजे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान यांच्या महत्वाकांक्षी योजना तरूणांना स्वयंरोजगार मिळवून देणाऱ्या आहेत, त्याचा लाभ घेतला पाहिजे. यासाठी माझ्या कार्यालयाकडून योग्य ती मदत केली जाईल, कोकणातील तरूणांना सर्व ती मदत करण्यास मी सहकार्य करेन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाच्या सुरवातीला विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()