रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे आज भाजपमध्ये नवसंजीवनी पहायला मिळाली. गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे कार्यक्रम, सभा, मेळाव्यांना बंदी असल्यामुळे पक्षीय पातळीवर फारसे कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होऊ शकले नाहीत. परंतु केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलेल्या राणे यांनी कार्यकर्त्यांना चेतवले.आता रडत राहायचे नाही तर भिडायचे असा सूचक संदेशही राणे यांच्या दौऱ्याने दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
जन आशीर्वाद यात्रा राणे यांच्या अटक, जामीन प्रकरणामुळे दीड दिवस स्थगित करावी लागली. त्यानंतर पुन्हा राणे यांची ही यात्रा आजपासून रत्नागिरीतून सुरू झाली आणि ती सिंधुदुर्गमध्ये दोन दिवस चालणार आहे. अटकेमुळे शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणामुळे ही यात्रा चांगलीच गाजली. या पार्श्वभूमीवर आज निघालेल्या यात्रेला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रत्नागिरी तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून मारुती मंदिर व भाजप कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमासाठी गर्दी केली. सकाळी पाऊस नव्हता, परंतु ११ वाजल्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. तरीही कार्यकर्ते मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.पुढचे आमदार, खासदार आपलेच असतील आणि राज्यातही सत्ता येईल, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली आणि मी परत- परत कार्यकर्त्यांना भेटायला येईल, अशी ग्वाही दिल्यामुळे कार्यकर्त्यांनाही मनोमन आनंद व्यक्त केला.येत्या दोन-तीन महिन्यांना नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राणे यांनी मदतीचे दिलेला शब्द कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होता.
मंत्रीपदाचा भाजपला उपयोग
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण भाजप-शिवसेनेची २५ वर्षांची जुनी युती मोडीत निघाल्याने भाजप स्वबळावर लढत आहे. त्यामुळे ताकद वाढवण्यासाठी भाजपला नारायण राणेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या मंत्रीपदाचा उपयोग होणार असल्याचे मानले जात आहे. गेल्या वीस वर्षांत भाजपने फारसे यश मिळवले नसल्याची खंत जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली होती. त्यांना राणेनी दिलासा देत आमदार माजी नव्हे आजी झाले पाहिजे, आपण प्रयत्न करू, असे सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.