कोकणात पर्यटकांनी अनुभवली प्लवंगाची निळाई-हिरवाईची अनोखी दृश्य

blue wave of sea also see in guhagar people enjoy in guhagar ratnagiri
blue wave of sea also see in guhagar people enjoy in guhagar ratnagiri
Updated on

गुहागर : समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येऊ लागला आहे. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई-हिरवाई मधून दिसते. क्षणभर संपूर्ण विजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग वाळूवरही चमचमताना दिसतो. गेले चार दिवस निरीक्षण केले असता ही निळाई दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून आले. यामुळे गुहागरकरांसह पर्यटकांना हे विलोभनीय दृश्‍य पाहण्याची संधी मिळत आहे. 

याआधी गणपतीपुळे, वरवडे, रत्नागिरी, आरेवारे, राजापूर येथेही असे दृश्‍य दिसले होते. डिसेंबर ते जानेवारीच्या काळात समुद्रातील प्लवंग हिरवट, निळसर प्रकाश सोडतो. या प्रकाशामुळे पाणी पेटल्यासारखे दिसते. येथील किनारपट्टीवर पाणी संथ असते, तेथे हे दृश्‍य सहजतेने पाहायला मिळते. गुहागर तालुक्‍यातील समुद्रकिनाऱ्यांवर सातत्याने लाटा किनाऱ्यावर धडकत असतात. त्यामुळे पेटलेले पाणी पाहण्याची संधी मिळणे कठीण आहे; मात्र, लाटांबरोबर प्लवंग घुसळू लागला की लाट चमकू लागते.

काहीवेळा विजेप्रमाणे लाटेबरोबर हा प्रकाश एका बाजूने दुसरीकडे सरकत जातानाही दिसतो. लाट फुटून किनाऱ्याजवळ जिथे थांबते तिथेही चमकणारे कण डोळ्यांना दिसतात. किनाऱ्यावरील हे दृश्‍य अन्य अंधार असलेल्या भागातून चटकन पाहता येते. गुहागरच्या चौपाटीवर, पोलिस मैदानाच्या चौपाटीवर आणि स्मशानात हायमास्ट लावण्यात आले आहेत. तेथून हे सौंदर्य अनुभवता येत नाही; मात्र हा परिसर सोडून अन्य ठिकाणी किनाऱ्यावर अंधारात उभे राहिल्यास हे विलोभनीय दृश्‍य सहज दिसते. नववर्षाच्या स्वागतापर्यत हा प्लवंग असाच राहिल्यास येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा अद्‌भूत नजारा पाहायला 
मिळणार आहे.

"मासेमारीसाठी खोल समुद्रात गेल्यावर काहीवेळा असे चित्र पहायला मिळते; पण किनाऱ्यावर हा प्रकार घडतो व हे सूक्ष्म शेवाळ आहे हे माहिती नव्हते. आम्हाला वाटायचे की काजव्याप्रमाणे चमकणारा हा माशांचा पुंजका असतो. काही वेळा ते मासे समजून पकडण्याचाही प्रयत्न केला; पण हाती काहीच न सापडल्याने घाबरलो होतो."

- मंगेश तांडेल, मच्छीमार

"गुहागरात इतक्‍यावेळा रात्री उशिरापर्यंत समुद्रावर थांबलो होतो, पण असा नजारा कधीच पाहिला नव्हता. आजचे दृश्‍य अद्‌भूत होते. अविस्मरणीय होते. निसर्गाचा हा चमत्कार तहानभूक विसरून आम्ही तब्बल तीन तास पहात होतो."

- रवींद्र पाटील, पर्यटक, पेण

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.