जयगडमधील 'त्या' बेपत्ता नौकेवरील एकाचा मृतदेह हाती

नौकेचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
boat
boatesakal
Updated on
Summary

नौकेचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथून पाच दिवसांपूर्वी मच्छीमारीसाठी गेलेल्या नौकेवरील सहापैकी एका खलाशाचा मृतदेह गुहागर किनाऱ्यापासून २० नॉटिकल खोल समुद्रात आढळून आल्याची माहिती जयगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी दिली. खलाशाचा मृतदेह सापडल्यामुळे ती नौका समुद्रात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नौकेचा शोध घेण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

अनिल आंबेरकर (वय ५०, रा. साखरी आगर-गुहागर) असे मृत खलाशाचे नाव आहे. पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या त्या नौकेचा कसून शोध जयगड पोलिस यंत्रणा करत आहे. या बोटीवर बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, अनिल आंबेरकर, गोकुळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे आदींचा समावेश आहे. नासीर हुसेनमियॅा संसारे यांच्या मालकीची नावेद ही मच्छीमारी नौका २६ ऑक्टोबरला जयगड बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाली होती.

boat
2020च्या कोरोना काळात दररोज 31 मुलांची आत्महत्या; NCRBचा धक्कादायक अहवाल

ही नौका २८ ऑगस्टला जयगड बंदरात येणे अपेक्षित होते; मात्र ३० तारखेपर्यंतही नौका जयगड बंदरात परत आली नाही. त्या नौकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
याविषयी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर नौकेचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तटरक्षक दलालाही याची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ३०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मच्छीमारांना समुद्रात काहीतरी तरंगताना दिसले. लागलीच कोस्टगार्डने २० वावात जाऊन पाहणी केली. यामध्ये एक मृतदेह हाती लागला. अनिल आंबेरकर असे या खलाशाचे नाव आहे. समुद्रात २० नॉटिकल परिसरात हा मृतदेह आढळला असल्याने नौकेला जलसमाधी मिळाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शेवटचा संपर्क झाला होता मंगळवारी

बेपत्ता झालेल्या नौकेवर संपर्कासाठीची कोणतीही यंत्रणा नाही. नौकेवरील खलाशाने मंगळवारी फोनवरून दाभोळजवळ कुठेतरी असल्याचे मालकाला कळवले होते. त्यानंतर त्यांचा काहीच संपर्क झालेला नव्हता.

boat
नारायण राणेंचा 'तो' इशारा म्हणजे धमकीच ; विनायक राऊतांचा आरोप

"बेपत्ता झालेल्या नौकेचा शोध घेण्यासाठी मत्स्य विभागाची नौका, तटरक्षक दल, पोलिसांची यंत्रणा कार्यरत आहे. तसेच सर्व मच्छीमारी सहकारी संस्थांच्या सभासदांना कळवले आहे. त्यांच्यामार्फतही शोध सुरू आहे."

- एन. व्ही. भादुले, सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.